चर्चा:त्रैक्य

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by सुबोध पाठक

नमस्कार, ट्रिनीटी या ऐवजी त्रेक्य हा अतिशय चपखल शब्द ख्रिस्ती धर्मात मराठी भाषेत वापरला जातो. कृपया लेखाचे नाव बदलावे असे सुचवतो. --सुबोध पाठक (चर्चा) २२:१९, ७ मार्च २०१८ (IST)Reply

@सुबोध पाठक:
संदर्भ कोठे मिळतील?
अभय नातू (चर्चा) २०:३८, ८ मार्च २०१८ (IST)Reply
ट्रिनिटी हा योग्य शब्द आहे मी त्रेक्य असे कुठेही ऐकले नाही --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:४१, ८ मार्च २०१८ (IST)Reply

टायविन सर, अभय सर,

त्रैक्य हा शब्द प्रोटेस्टंट पंथात तरी नेहेमी वापरला जातो. आताच जालावर काही संदर्भ शोधले ख्रिस्ती धर्म संबंधातील लिखाणात हा शब्द वापरला गेला आहे हे दर्शवण्यासाठी.

https://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/2744815.cms ख्रिस्ती धर्मात परमेश्वराला त्रैक्य स्वरूप (ट्रिनिटी) मानले आहे. एकच देवत्व आणि तीन व्यक्तित्व असे देवाचे स्वरूप आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा अशी त्यांची नावे आहेत. पिता आपले सर्वस्व पुत्राला बहाल करतो, पुत्र ते वरदान पित्याला परत करतो. ही त्यांच्यातील शाश्वत देवाणघेवाण म्हणजे पवित्र आत्मा आहे. थोडक्यात, परमेश्वर नातेसंबंध आहे. देवाचे छोटेसे अलौकिक कुटुंब आहे, नाते आहे तोपर्यंत त्रैक्य अस्तित्वात आहे.

https://marathibible.wordpress.com/2008/06/22/a-definition-of-faith/ या पानावर खालील उल्लेख वाचनात आला

प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो.” (२ करिंथ १३:१४) जसे unity म्हणजे ऐक्य, तसेच trinity म्हणजे त्रैक्य. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तीन वेगवेगळ्या व्यक्ती असल्या तरी त्या एकच आहेत अ्सा त्याचा अर्थ आहे. ही देवाची तीन रूपे आहेत, तीन भाग नाहीत. तीनही पूर्णपणे देव आहेत. पण त्रैक्य हा शब्द बायबलमध्ये कुठेच नाही. ती एक कल्पना आहे. तो एक अनुभव आहे. ते एक रहस्य आहे. काही ख्रिस्ती पंथ त्रैक्य मानत नाहीत. रंजन केळकर


@अभय नातू: कृपा लेख पुन्हा ट्रिनिटी करावे अशी मागणी --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:३६, ९ मार्च २०१८ (IST)Reply

@Tiven2240 आणि सुबोध पाठक:,
येथे मतभेद ट्रिनिटी/त्रैक्य याच्या अर्थाचा किंवा वापराचा नसून लेखाचे शीर्षक काय असावे याबद्दल आहे. ट्रिनिटी/त्रैक्य हे अनेक ख्रिश्चन पंथात आहे हे वादातीत आहे.
ट्रिनिटी (किंवा होली ट्रिनिटी) हा इंग्लिश शब्द आहे तर त्रैक्य हा मराठी. कोणत्या भाषेतील शीर्षक असावे? यात दोन्ही बाजूंनी मुद्दे आहेत.
ट्रिनिटी राखल्यास इंग्लिश शब्द का वापरावा? मूळ हिब्रू (हशिलुश हाकादोश) किंवा लॅटिन (ट्रिनिटास) का नको? त्रैक्य राखल्यास हा शब्द नेमका येथे बसतो का? असा शब्दप्रयोग मराठीतू असलेल्या ख्रिश्चन धर्मग्रंथांत केलेला आहे?
लेखाचे शीर्षक बदलण्यापूर्वी वरील प्रश्नांचा उहापोह व्हावा.
याच प्रमाणे - ओल्ड टेस्टामेंट/जुना करार (मूळ हिब्रू - हब्रीत हयेशनाह किंवा पहिले भाषांतर असलेले ग्रीक/लॅटिन (सेप्टुआगिंट), मॅथ्यू/मत्तया, बॅप्टिझम/बाप्तिस्मा या शब्दांनाही हाच नियम लागू करावा कि प्रत्येक शब्दास वेगळ्या प्रकारे हाताळावे?
अभय नातू (चर्चा) २२:५६, ९ मार्च २०१८ (IST)Reply

@अभय नातू: तुमचे म्हणणे कळले. सद्या ट्रिनिटी हा शब्ध चुकीचा आहे की नाही यावर चर्चा करूया. नवीन करार व इतर त्यातील पुस्तकांचे नावे बायबल मध्ये आहेत. याचे मराठी भाषा कॉपी मी विकिमीडिया कॉमन्स वर अपलोड केले आहे आपण यांनी क्रॉस चेक करावे(File:मराठी बायबल.pdf) . ट्रिनिटी बदल मी पाहतो व रविवारी चर्च मध्ये सुद्धा विचारतो व योग्य काय ते सांगतो. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:३३, ९ मार्च २०१८ (IST)Reply

अभय सर, टाय विन सर , वापरात असणारे इंग्रजी शब्द जास्ती प्रचलित असल्याने लेखाचे नाव मराठी ठेवावे (जे फारसे वापरात नाही ) कि इंग्रजी ठेवावे हा प्रश्न मलाही वाणिज्य विषयक लेखन करताना पडतो . पण पुनर्निर्देशन करून दोन्ही प्रकारच्या वाचकनाची सोया करता येणे शक्य आहे . आता सुद्धा कुणी ट्रिनिटी म्हणून शोध घेतला तर त्रैक्य या लेखाकडे जात येते. शक्यतो मराठी शब्दच वापरावेत जेणेकरून लोकांनाही अप्रचलित शब्द समजतील असा विचार आहे .

--सुबोध पाठक (चर्चा) १५:४९, १० मार्च २०१८ (IST)Reply

"त्रैक्य" पानाकडे परत चला.