चर्चा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद
या लेखाचे भारतीय संसद या लेखात विलीनीकरण करावे.
पुतळ्याला संसदेसमोर असल्याचे सोडून डॉ. आंबेडकरांच्या इतर पुतळ्यापेक्षा इतर महत्व नाही.
एकत्रिकरण साचा हटवा
संपादनहा लेख संसद भवनासंबंधी नसून स्वतंत्र्यपणे आंबेडकर पुतळ्यासंबंधीत आहे, जो या संसद भवन परिसरात आहे. म्हणून या लेखाला येथून हटवून संसद भवन मध्ये जोडणे चूकिचे आहे.
उदाहरण म्हणून, Statue of Mahatma Gandhi, Parliament Square, London हा लंडनच्या संसद भवनातील महात्मा गांधींचा पुतळा. --संदेश हिवाळेचर्चा २०:२७, १९ सप्टेंबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा २०:२७, १९ सप्टेंबर २०१७ (IST)
- तुम्ही दिलेले उदाहरण -
- १. इंग्लिश विकिपीडियावरील आहे
- २. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे आहे
- ३. महात्मा गांधींचा हा पुतळा इंग्लंडच्या संसदेसमोर आहे. भारतात महात्मा गांधींचा पुतळा (नुसतेच) असणे हे लक्षणीय नाही पण इतर देशात असा पुतळा असणे हे लक्षणीय आहे म्हणून असा स्वतंत्र लेख असू शकतो.
- लेखाचा विषय असलेल्या पुतळ्याचे (महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर किंवा इतर कोणीही) स्वतःचे वेगळे महत्व, वैशिष्ट्य किंवा उल्लेखनीय इतिहास असेल तरच त्यासाठी वेगळा लेख करावा. तसे न केल्यास असंख्य पुतळ्यांचे असंख्य लेख तयार करावे लागतील, उदा. झाशीची राणीचा पुतळा, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे / बाजीराव पुतळा, शनिवारवाडा, पुणे / महात्मा गांधी पुतळा, भारतातील कोणतेही शहर.
- वर लिहिल्याप्रमाणे प्रस्तुत लेखातील पुतळ्याला वेगळा, उल्लेखनीय इतिहास नाही तसेच त्याचे वैशिष्टही दिसून येत नाही. असे असले तरी हा मजकूर घालवून न टाकता संसद भवन लेखात हलवावा. जर संसद भवनाभोवतालच्या अनेक पुतळ्यांबद्दलची माहिती मिळाली तर संसद भवनातील पुतळे (किंवा तत्सम) शीर्षकाखाली वेगळा लेख लिहिता येईल.
- अभय नातू (चर्चा) २१:०६, १९ सप्टेंबर २०१७ (IST)
डॉ. आंबेडकरांचे पुतळे जगभर विशेषत: भारतात खूप मोठ्या संख्येने गल्ली, गाव , नगर, शहरात उभारलेले आहेत. पण या लेखातील "डॉ. आंबेडकर आंबेडकर पुतळा" एखाद्या गल्लीत, गावात, नगरात किंवा शहरातात कुठेतरी उभारलेला नसून तो भारताच्या संसद भवनासमोर उभारलेला पुतळा आहे, म्हणून तो इतरांहून विशेष आहे. म्हणून इतर ठिकाणी असलेल्या आंबेडकर पुतळ्यांना आणि संसद भवनासमोर असलेल्या आंबेडकर पुतळ्याला एकाच नजरेने पाहिले जाऊ शकत नाही.
भारतात असा कोणता आंबेडकर पुतळा आहे, ज्याला आंबेडकर जयंती दिनी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, विविध मंत्री व इतर अनेक दिग्गज नेते अभिवादन करतात? हाच तो एकमेव पुतळा आहे. बाबासाहेबांचे इतर पुतळे व हा पुतळा यात मोठा फरक आहे, या पुतळ्याच्या जागेमुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. इतर ठिकाणचे आंबेडकर पुतळे लक्षणीय नाहित पण संसद भवनासमोरील आंबेडकर पुतळा लक्षणीय आहे. --संदेश हिवाळेचर्चा ००:४७, २० सप्टेंबर २०१७ (IST)
- भारताच्या संसदेसमोर भारताच्या संघटनेच्या शिल्पकाराचाच पुतळा असणार ना? त्यात नवल ते काय? तो तेथे पाहिजेच. तेथे इतर कोणाचा ठेवल्यास ती बाब उल्लेखनीय होईल. त्यामुळे भारतीय संसदेसमोर आहे म्हणून या तर्कात विशेष वजन नाही.
- आंबेडकर जयंती दिनी मुंबईतील पुतळ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यपाल व इतर नेते अभिवादन करतात. त्यांचे लेख का नको? कर्व्यांच्या पुतळ्याला पुण्याचे महापौर अभिवादन करतात. मग त्याबद्दल लेख पाहिजे? प्रत्येक पुतळ्याला अनेकदा अनेक दिग्गज नेते (तुमचाच शब्द) पुतळ्यातील व्यक्तीच्या जयंत्या/मयंत्यांना अभिवादन करतात. प्रत्येकाला एक लेख पाहिजे? जर एकाचेही उत्तर नाही असेल तर दिग्गज नेते अभिवादन करतात म्हणून याही तर्कात वजन नाही.
- तुम्ही म्हणता - या पुतळ्याच्या जागेमुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे हे अगदी बरोबर आहे. या पुतळ्याला त्याचे स्वतःचे वेगळे असे महत्व नाही हे आपण दोघेही म्हणत आहोत. असे असता ज्याच्यामुळे महत्व आहे त्या लेखातच ही माहिती पाहिजे. वेगळी नाही.
- लेखाचे विलीनीकरण करण्याचा आग्रह मी कायम करीत आहे. लक्षात घ्या की पुतळ्याबद्दलची माहिती घालवून टाकण्याचा प्रस्ताव नाही तर तो योग्य त्या ठिकाणी लिहिण्याचा हा प्रस्ताव आहे.
- अभय नातू (चर्चा) ०४:१०, २० सप्टेंबर २०१७ (IST)
- मला वाटते अशाच एकसारख्या विचार विमर्श योग्य लेखांबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता/एकत्रिकरण-विलगीकरण येथे एकत्रीत विचार करता येईल म्हणजे विश्लेषण आणि सहमती सोपी होईल.
- मी या चर्चेसाठी लगेच वेळ देऊ शकत नसलो तरी जेव्हा सवड होईल तेव्हा विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता/एकत्रिकरण-विलगीकरण पानावर चर्चा करेन. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:५८, २० सप्टेंबर २०१७ (IST)
मी वरती केंद्र-राजधानी नवी दिल्लीतील राष्ट्रपती, प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री यासारखे केवळ राष्ट्रीय पातळीचे नेते या पुतळ्याला अभिवादन करतात हा उल्लेख केलाय. देशभरात तर शेकडो आंबेडकर पुतळ्यांना लहान मोठ्या पदावरील अभिवादन करत असतील, तो भाग वेगळा.
तुम्ही पुतळ्याच्या जागेला महत्त्वपूर्ण मानता व पुतळ्याला त्याचे स्वतःचे वेगळे असे महत्व नाही असेही तुम्हाला वाटते. पण ह्या पुतळ्याच्या जागेमुळेच (संसद भवन) तेथिल आंबेडकर पुतळ्यालाही स्वत:चे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. --संदेश हिवाळेचर्चा ११:४०, २० सप्टेंबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ११:४०, २० सप्टेंबर २०१७ (IST)
- राष्ट्रीय पातळीचे नेते रोजच एका पुतळ्याला अभिवादन करीत असतील. त्यांचेही लेख करायचे का? (उत्तर- नाही!)
- पण ह्या पुतळ्याच्या जागेमुळेच (संसद भवन) तेथिल आंबेडकर पुतळ्यालाही स्वत:चे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
- नक्की काय म्हणत आहात? तुमचे तर्क रोज बदलत आहेत. पुतळ्या संसद भवनाजवळ असल्यामुळे संसद भवनाला महत्व आले कि संसद भवनाजवळ असल्यामुळे पुतळ्याला महत्व आले?
- जर पुतळ्यामुळे संसदभवनाला महत्व आले असे म्हणत असलात तर ते कशावरून? तुमच्या या प्रतिपादनाला लेखात कोठेच आधार नाही. इतर ठिकाणी शोध घेतला असताही काही सापडले नाही. आणि पुन्हा एकदा, प्रत्येक पुतळ्यामुळे संसदभवनाला महत्व येत असेल तर प्रत्येक पुतळ्याचा लेख पाहिजे?
- संसदभवनामुळे पुतळ्याला महत्व आले असे म्हणत असाल (वाटते तरी आहे) तर आपले एकमत आहे आणि त्याचमुळे लेखातील मजकूर संसद भवन लेखात विलीन करावा असे मी पुन्ही एकदा मांडत आहे.
- तुम्ही पुतळ्याचे स्वतःचे महत्व काय ही वेगळ्या लेखासाठीची कारणे न देता नुसते पुतळा महत्वाचा आहे हेच वारंवार सांगत आहात.
- अभय नातू (चर्चा) १९:२७, २० सप्टेंबर २०१७ (IST)
माझ्या म्हणण्याला तुम्ही तोडून वेगळे करून लिहिलाय. राष्ट्रीय नेते पुतळ्याला अभिवादन करतात म्हणून हा पुतळा महत्त्वाचा आहे हा तर्क तुमचा आहे, माझा नव्हे. म्हणून असला खोटारडा तर्क माझ्या नावावर पाडू नका. राष्ट्रीय नेत्यांचे अभिवादन व संसद भवन परिसरातील पुतळा याबद्दल मी वरती काय म्हणालो ते परत व्यवस्थित वाचा.
आंबेडकर पुतळ्यामुळे संसदभवनाला महत्व आले या तुमच्या तर्कावर काय बोलू न काय नको बोलू झालेय! असले निव्वळ मुर्खपणाचे तर्क तुम्ही लावलाय व ते माझ्याच नावे खपवताय!!!
तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, माझ्या मुद्दांवर तुमच्या मनात येईल असे काहीही व कसलेही तर्क करू नका! --संदेश हिवाळेचर्चा १५:१६, २१ सप्टेंबर २०१७ (IST)
माझे तर्क आधीप्रमाणे आहेत, फक्त तुम्ही त्यांना तुमच्या भाषेत मांडतात...
पण ह्या पुतळ्याच्या जागेमुळेच (संसद भवन) तेथिल आंबेडकर पुतळ्यालाही स्वत:चे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या माझ्या वाक्याचे तुम्ही तुम्च्या मनासारखे खोटे तर्क लावतेल..!!! मी लिहितोय काय ते पहा, उगाच भलते अर्थ का काढताय?? --संदेश हिवाळेचर्चा १५:१६, २१ सप्टेंबर २०१७ (IST)
- तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, माझ्या मुद्दांवर तुमच्या मनात येईल असे काहीही व कसलेही तर्क करू नका!
- माझे मुद्दे मी मांडले. त्यांना उत्तर देणे सोडून रोज एक नवीन argument करीत आहात.
- या पुतळ्याला स्वतःचे काय महत्व आहे? या प्रश्नाला अजूनही उत्तर नाही. जे तर्क मांडलेत त्याचे मी खंडन केले.
- असले निव्वळ मुर्खपणाचे तर्क तुम्ही लावलाय व ते माझ्याच नावे खपवताय!!!
- हे तुमचे बोलणे ठीक नाही. पुन्हा वाचा - जर तुमचा तर्क हा असेल तर तो फोल आहे हे मी लिहिले. मला मूर्ख ठरविण्याआधी कृपया डोके शांत ठेवून आणि आपले bias बाजूला ठेवून विचार करा. मग लिहा.
- मुद्देसूद चर्चा करणे सोडून व्यक्तिगत टीका करणे बंद करा. आपल्या मनासारखे झाले नाही कि अद्वातद्वा बोलणे तुम्हाला शोभत नाही इतकेच लिहितो.
- अभय नातू (चर्चा) १९:२७, २१ सप्टेंबर २०१७ (IST)
या पुतळ्याला स्वतःचे काय महत्व आहे? याचे अजून कोणते उत्तर देणे अपेक्षित आहे? मी याचे उत्तर प्रत्येक चर्चेत दिलेय. तुम्ही माझे चूकिच्या पद्धतीने घेतलेय. परत परत उदाहरणे देत नाही. आताही हेच सांगेन की, तुम्ही तुमचेच मुद्दे मांडा, व माझ्या मुद्दांचे वाकडे तर्क लावू नका!
जे तर्क मांडलेत त्याचे मी खंडन केले. हे तुमचे विधान चूकिचे आहे, तुम्ही काही खंडन केलेले नाही फक्त नवीन अर्थहिन तर्क उपस्थित केलेत. --संदेश हिवाळेचर्चा २१:१६, २१ सप्टेंबर २०१७ (IST)
इतर सदस्य चर्चेत सहभागी व्हा
संपादनअभय नातू सर, या विषयी तुमच्याशी चर्चा करणे आता व्यर्थ आहे. कारण १) माझ्या बोलण्याचे तुम्ही खूप वेगळेच लावतात. आणि २) तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गल्ली - चौकातील पुतळ्याला व भारतीय संसदेसमोरील पुतळ्याला एकच प्रकारचे मानता.
म्हणून मला याविषयी इतर सदस्यांचे मत जाणायचे आहे की, गल्ली चौकातील आंबेडकर पुतळा सामान्य बाब असेल म्हणून त्यावर लेख बनूच शकत नाही पण संसदेपुढील पुतळाही इतर पुतळ्यांप्रमाणे सामान्य आहे का? की त्याचे इतरांहून काही वेगळे महत्त्व आहे ? --संदेश हिवाळेचर्चा १५:२७, २१ सप्टेंबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १५:२७, २१ सप्टेंबर २०१७ (IST)
- नावाने वर उल्लेख केल्यामुळे लिहीत आहे.
- बोलण्याचा अर्थ चर्चेच्या ओघातच आहे. तुम्ही पुन्हा एकदा सगळा संवाद वाचा म्हणजे लक्षात येईल. गल्ली-चौकातील पुतळे हे उदाहरण दिले. मूळ प्रश्न हाच आहे की या पुतळ्याला स्वतःचे महत्व काय?
- एकत्रीककरण प्रस्ताव साचा पुन्हा काढू नका. चर्चा पूर्ण झालेली नाही.
- इतर सदस्य काय ते लिहितीलच.
- अभय नातू (चर्चा) १९:३३, २१ सप्टेंबर २०१७ (IST)
तुम्ही चर्चेत माझ्या अनेक मुद्द्यांचे तुमच्या पद्धतीने चूकिचे अर्थ लावून टाकलेत. या पुतळ्याला महत्व आहे काय? या मूळ प्रश्नाचेच उत्तर मी अनेकदा दिलेय.
- आणि प्रत्येक मुद्द्याचे मी खंडन केले.
- असो, माहितगारांनी सुचविल्याप्रमाणे काही काळ दुर्लक्ष करीत आहे.
- इतर कामात मदत लागली तर कळवालच.
- अभय नातू (चर्चा) २१:२७, २१ सप्टेंबर २०१७ (IST)
- विषय वेगळा काढून सर्व तार्कीकबाजू समजणे काही वेळा कठीण जाते. तुलनेसाठी इतर अशाच पण फारसा विवाद नसलेल्या केसेस वर सहमती झाली की तेच संकेत इतरत्र वापरणे अधिक सुलभ होते. अधीक मध्यवर्ती उल्लेखनीयता चर्चेत सहमती होई पर्यंत वाट पहाण्या शिवाय पर्याय आणि तशी घाईची गरज मला तरी दिसत नाही. आपण दोघांनीही चर्चेची घाई टाळावी असे मत आहे. आणि या लेख पाना कडे जरासे दीर्घकाळासाठी दुर्लक्ष करावे.
- @संदेश, मथळा साचे विकिपीडियातील नियमीत प्रक्रीया आहे. मथळासाचांनी पॅनिक होण्यासारखे काही नसते. मथळा साचे काढणे टाळलेले अधीक सयुक्तीक असावे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:५२, २१ सप्टेंबर २०१७ (IST)
या लेख पानाकडे काही काळासाठी दुर्लक्ष करतो. व इतर लेखांकडे लक्ष देतो.
--संदेश हिवाळेचर्चा २१:१६, २१ सप्टेंबर २०१७ (IST)
- वेळ मिळाल्यास (साधारणत: आठवडाभरात) माझे मत मांडण्याचा प्रयत्न करील. -- संतोष दहिवळ (चर्चा) २२:२८, २१ सप्टेंबर २०१७ (IST)
सौम्य अनुषंगिक अवांतर
संपादनपुतळ्याच्या अनावरणाच्या वेळीच्या लेखात नोंदवलेल्या उपस्थितात इंदिरा गांधींचे नाव दिसले नाही. इंदिरा गांधी नसाव्यात अशी २ एप्रील १९६७ रोजीची मोठी घटना आंतरजालावर तशी शोधून सापडली नाही. परदेशात वगैरे असतील अशी शक्यता अगदिच नाकारता येत नसली तरी ज्या पुतळ्याचे अनावरण अगदी संसद परिसरात होते ते काही दिवस पोस्टपोन होऊनही होऊ शकले असते. मोरारजी देसाईंनी इंदिरा गांधींना उपस्थीत न राहण्याची संधी न देता उरकुन घेतले असे मोरारज् इंदीरा गांधींच्या आपापसातील मतभेदांमुळे होणारच नाही असे नाही. खूप मोठा मुद्दा नाही पण सहज कुतूहल चाळवले.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:२८, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)
पुतळ्याची उंची?
संपादनपुतळ्याची एकूण उंची १५ फूट, चौथर्यापासूनची उंची साडेबारा फूट, म्हणजे चौथरा फक्त अडीच फूट उंचीचा. पुतळ्याची उंची साडेबारा फूट ही चारपट लाईफ साईज होत असेल तर माणसाची सरासरी उंची साडेबारा भागिले चार = ३.१२५ फूट. .... ज (चर्चा) १९:०६, ६ ऑक्टोबर २०१७ (IST)
संदर्भ समस्या
संपादन@Tiven2240: प्रस्तावना मध्ये मी दोनदा वापरलेला Ambedkar and Buddhism नावाचा संदर्भ दिसत नाही, कृपया दुरूस्ती करा. --संदेश हिवाळेचर्चा १३:०९, ११ नोव्हेंबर २०१८ (IST)