चर्चा:कोरेगावची लढाई

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic शिर्षक

संदर्भ??

संपादन

कोणी या मजकुराबद्दल संदर्भ देऊ शकेल काय?

--संकल्प द्रविड 05:07, 18 जानेवारी 2007 (UTC)

एक संदर्भ काल देण्यात आला होता त्याचा लिहिलेल्या मजकूराशी काहीही संबंध नव्हता.

अभय नातू 14:26, 18 जानेवारी 2007 (UTC)

हा लेख घालवून टाका. कारण भीमा कोरोगाव हे स्थळाचे नाव आहे. भीमा कोरेगांव लढाई असे काही नाव द्यावे. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 03:40, 19 जानेवारी 2007 (UTC)

सहकार्य

संपादन

@प्रसाद साळवे: सर, कृपया या लेखाच्या विस्तारात मदत करा. संदेश हिवाळे (चर्चा) १९:३७, १८ एप्रिल २०१७ (IST) संदेश हिवाळे (चर्चा) १९:३७, १८ एप्रिल २०१७ (IST) @Nikhil.Joshi1010: लढाई अनिरर्णीत राहीली हा बदल आपण कोणत्या अधारे केला आहे. ?? तसेच कोरेगावला कोणता किल्ला आहे.ज्यांचा बचाव झाला ?? इंग्रजी लेख वाचून मगच लेखात बदल करावा. ही विनंती प्रसाद साळवे २३:५९, २९ एप्रिल २०१७ (IST)Reply

Nikhil.Joshi1010 (चर्चा) ००:१८, ३० एप्रिल २०१७ (IST) मला मराठी रियासती खंड ८त खालील गोष्ट मिळाली: घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीरावाशीं अकस्मात गांठ पडली. बापू गोखल्यास श्रीमंतांनीं आज्ञा केली, कीं आज लढाई करून आम्हास पुढें जाण्यास मार्ग करून द्यावा. गांवास लहानशी तटबंदी होती तींत इंग्रज आश्रयार्थ गेले. त्यांजवर दुसऱ्या बाजूनें मराठ्यांनी तोफांचा मारा सुरु केला. जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील आरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तरवारीचेच युद्ध झाले. इंग्रज शिकस्त झाले. त्यांचे पुष्कळसे ऑफिसर्स व लोक मारले गेले. रात्री 9 वाजेपर्यंत लढाई चालून पेशव्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आलें. इंग्रजांचे 175 जखमी झाले, त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे 500 लोक पडले. थोडक्या लोकांनी पुष्कळांशी लढून आपला निभाव केल्याबद्दल कोरेगांव येथें इंग्रजांनी स्मारकाचा स्तंभ उभारला आहे. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून ज. स्मिथ येत असतां त्यास ओझरच्या घाटांत त्रिंबकजी डेंगळ्याच्या रामोशांनी इतके सतावून सोडले की ता. 2 जानेवारी रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोंचला. त्याच दिवशी कॅ. Staunton जखमी झालेले लोक व उरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूरच्या छावणीत गेला.'Reply

वरील संदर्भ पाहता गावाची तटबंदी (कोट) हा किल्ला म्हणून लिहिले आहे. शिवाय कप्तान स्तौंतोन विजयी झाला असता तर पुण्यावर गेला असता, मात्र त्याचे वर्तन हे एखाद्या पराभूत सरदारास्तव आहे, तस्मात् लढाई अनिर्णीत राहिली आहे, किंवा मराठी सरदारांची tactical victory झाली असेल, म्हणून हा बदल मी करवला



थोडक्या लोकांनी पुष्कळांशी लढून आपला निभाव केल्याबद्दल कोरेगांव येथें इंग्रजांनी स्मारकाचा स्तंभ उभारला आहे. याचा अर्थ काय ? तसेच या लढाईत ईस्ट इंडिया कंपनी तर्फे लढणारी महार तुकडी विजयी झाल्याचे पुष्कळ संदर्भ आपण चाळले तर सापडतील. इंग्रजी विकीवारील लेखातील रेफरंन्स ही पहावेत तसेच http://www.thehindu.com/news/national/When-Mahars-fought-on-home-turf-and-helped-Britain-win/article16989587.ece हे ही पहावे. प्रसाद साळवे ००:२८, ३० एप्रिल २०१७ (IST)Reply

•••घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीरावाशीं अकस्मात गांठ पडली. हे खोटे आहे. पेशव्यांची कोंडी करण्यासाठी खूप आधी सैन्य तेथे तैनात होते. तेव्हा अचानक गाठ पडेल कशी..?  प्रसाद साळवे   ००:४६, ३० एप्रिल २०१७ (IST)Reply


@Nikhil.Joshi1010: सर ,आपण उल्लेखलेले रियासती खंड अविश्वसनीय आहात. या ऐवजी विविध लेखकांचे संदर्भ पहावेत. कोरेगावच्या लढाई विषयी मराठी रियासत आणि सदाशिव आठवले यांचे सरदार बापू गोखले हे पुस्तक फारसे विश्वसनीय असल्याचे दिसून येत नाही. तुलनेने विठ्ठल पुणेकर लिखित बापू गोखल्यांची बखर या ठिकाणी अधिक विश्वसनीय अशी वाटते. याचे कारण म्हणजे, बखर लेखकास कोणत्याही पक्षाचे गुणगान करण्यापेक्षा आपल्याला जी माहिती ज्ञात आहे ती लिहून काढणे गरजेचे वाटत होते. त्याउलट सरदेसाई आणि सदाशिव आठवले यांचे लेखन गोंधळात टाकण्यासारखे असल्याचे दिसून येते. कोरेगाव येथील लढाईमध्ये मराठी फौजेचा विजय झाल्याचे सरदेसाई अप्रत्यक्षपणे नमूद करतात परंतु त्यासोबतच इंग्रजांनी मोठ्या शर्थीने आपला बचाव केल्याचे आणि लढाईमधून बाजीराव पेशवा पळून गेल्याचेही त्यांनी नमूद करून वाचकांचा गोंधळ मात्र उडवून दिला आहे. सदाशिव आठवले यांनी दिलेली माहिती देखील जवळपास अशीच आहे. त्यांच्या मते हि लढाई एकप्रकारे अनिर्णीत अशी होती. इथपर्यंत ठीक आहे परंतु, 4 जानेवारीच्या बातमीपत्राचा हवाला देत ते लिहितात कि त्या तारखेपर्यंत बाजीरावाचा मुक्काम फुलगावी होता हे काही पटत नाही. याचे कारण म्हणजे फुलगाव हे स्थळ चाकण आणि भीमा - कोरेगाव यांच्या दरम्यान असून या ठिकाणाहून भीमा कोरेगाव अगदीच जवळ म्हणजे 8 - 10 किलोमीटर्सपेक्षाही कमी अंतरावर आहे. बाजीराव पेशव्याच्या पाठीवर जनरल स्मिथची फौज असल्याचे खुद्द आठवले यांनीच लिहिले आहे आणि असे असूनही कोरेगावची लढाई झाल्यावर बाजीरावाचा मुक्काम 4 जानेवारी रोजी फुलगावी होता असे ते लिहितात याला काय म्हणावे ? याउलट विठ्ठल पुणेकर लिखित बखरीमधील माहिती विश्वसनीय वाटते कि लढाई झाल्यावर मराठी फौजा राजेवाडीस निघून गेल्या. राजेवाडी हे स्थळ जेजुरीच्या जवळपास असून भीमा - कोरेगावच्या युद्धक्षेत्रापासून सुमारे 30 - 40 किमी. अंतरावर आहे. प्रसाद साळवे ००:५६, ३० एप्रिल २०१७ (IST)Reply

Nikhil.Joshi1010 (चर्चा) ०१:२२, ३० एप्रिल २०१७ (IST)Reply

मी आपला मजकूर डिलीट केलेला नाही, कदाचित अगोदरच्या प्रतिक्रियेवर उत्तर देत असल्याने असे झाले असेल, आपण माझाही मजकूर डिलीट करू नये, म्हणून पुनश्च पोस्ट करत आहे.

कृपया वर्तमानपत्रातील बातम्या आणि रियासातीतील कागद ह्यांना एकाच दृष्टीने पाहू नये, राजवाड्यांनी तसेच बापू गोखले ह्यांची कैफियत लिहिणारे लेखक ह्यांनी वर्षानुवर्षे अभ्यास करून असा तर्क मांडला आहे. खालील पुस्तकांतही असाच काहीसा सूर आहे १. https://books.google.com/books?id=NeCSDAAAQBAJ&pg=PA39#v=onepage&q&f=false (श्रद्धा कुंभोजकर) २. माउंटस्टूअर्ट एल्फिन्स्टन ह्यानेदेखील पेशव्यासाठी हा एक लहानसा विजय होता असे त्याच्या रोजनिशीत लिहिले आहे (Peshwa Bajirao II and The Downfall of The Maratha Power: S.G. Vaidya: https://books.google.ca/books?id=X3YBAAAAMAAJ) ही लिंक इंग्रजी विकिपीडियामध्येदेखील आहे

आता राहता राहिला कोरेगावच्या स्तंभाचा विषय, तर शेवटी इंग्रज जिंकले म्हणून त्यांनी गमावलेल्या संधीचा उलट अश्याप्रकारे स्तंभ उभारून इंग्रजांनी यशस्वी बचाव कसा केला हे दाखवले, परंतु ते वस्तुस्थितीला धरून नाही, इंग्रजांचा हा विजय नव्हता, हे इतिहासकारांचेच मत आहे. आजकालच्या वर्तमानपत्रात वास्तविक इतिहास नसतो.

माझा मजकूर डिलीट करू नये

संपादन

आपणा आपले मुद्दे जरूर मांडा. परंतु माझा मजकूर डिलीट करू नये. यामुळे चर्चा एकांगी होते.. असे अन्य वाचकांच्या लक्षात येईल. माझे मुद्दे तसेच ठेवावेत. प्रसाद साळवे ०१:१७, ३० एप्रिल २०१७ (IST)Reply

मजकूर संपादन

संपादन
 

- समर्थन. विशेषतः चर्चा पानांवर काळजी घेणे आवश्यक आहे.

आपण एखादे पान किंवा विभाग बदलायला घेतले असतानाच इतर संपादकाने तेच पान (किंवा विभाग) उघडून, मजकूर बदलून जतन केला तर असे होते. मला वाटते येथे अनवधानाने हे झाले असावे. असे असो किंवा नसो, इतर संपादकांचा मजकूर आपण घालवत नाही हे पाहण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात -

१. शक्य तितका लहान विभाग संपादनास घ्यावा (पूर्ण पानाऐवजी विभाग, विभागाऐवजी उपविभाग, इ.)

२. आपले बदल प्रकाशित करण्याआधी झलक पहावी. अशाने आत्तापर्यंत कोणी संपादन करुन टाकले असले तर चेतावणी मिळते.

३. आपले बदल जतन करतानाही अशी चेतावणी मिळू शकते.

४. (२) किंवा (३) मध्ये चेतावणी मिळाल्यास --

४.१ पानाच्या शेवटी स्क्रोल करावे. तेथे तुमचे बदल सापडतील.
४.२ तुमचे बदल इतर ठिकाणी (नोटपॅड, इ.) कॉपी-पेस्ट करुन ठेवावे.
४.३ वाचा वर टिचकी द्यावी. Do you want to leave this page? अशी विचारणा होईल (इंटरनेट एक्सप्लोरर वर. इतर न्याहाळकांत तत्सम विचारणा असेल.)
४.४ Yes म्हणावे.
४.५ इतर सदस्याने केलेले बदल वाचावे व त्यानुषंगाने आपल्या उत्तरात योग्य ते बदल करावे.
४.५ तेच पान/विभाग/उपविभाग पुन्हा संपादनास घ्यावा.
४.६ आपले बदल जतन (प्रकाशित) करावे.

सगळ्यात महत्वाचे -- जर कोणाकडून अनवधानाने बदल घालवले गेले तर हमरीतुमरी वर न येता (पूर्वी अनेक वेळा अशी युद्धे झालेली आहेत) इतर संपादकांस हलकेच आठवण करून द्यावी आणि इतरांनी त्यावरुन सुज्ञपणे बदल करावे (जशी साळवेंनी येथे केली आहे आणि जसे जोशींनी त्यानुसार बदल केले आहेत).

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०१:३१, ३० एप्रिल २०१७ (IST)Reply

आपलै संदर्भ तपासले

संपादन

निखिल जोशी सर, इपले संदर्भ तपासले. ज्यात हा दोहो कडील विजय नव्हता असे म्हटले आहे. तसेच लेखिकेची कोणही ठाम भूमिका संपूर्ण लेखात दिसत नाही. त्यात असाही मजकूर आहे. "as it was the one of the last battles of the Anglo Maratha Wars which ended with a complete victory of the company....." यावरून याचा अंदाज येतो. दुसऱ्या लिंक मध्ये मजकूर दिसत नाही. . तसेच आपण वर्तमानकाळात इतिहासाचे अवलोकन करून वृतपत्रात मांडलेले मत हे अधीक वास्तववादी असते. कारण साधारणतः शंभर वर्षापूर्वी जे इतिहासकार झाले ते वास्तववादी इतिहासापेक्षा कथन अधिक करत असत... त्यांचे लेखन हे जुने असले तरी तरी तितकीशी विश्वासाह् दिसत नाहीत. विशेषतः पेशवेकालीन इतिहासाबाबतीत दोन परस्पर विरोधी प्रवाह दिसून येतात. तीच गत १८५७ च्या उठाव कि स्वातंत्र्य युद्ध या आशयात दिसून येते. म्हणून जे सर्व संमंत आहे.ते मत स्विकारावे. लेखातील मुद्दे आपले रास्त असतील तर आपण दिलेले संदर्भ जोडून खोडून काढावेत. अचानक लेखातील भाग बदलू नये असे वाटते. तसेच तो बदल आपण इंग्रजी विकीपेडियावरही करावा म्हणजे तेथील भाषांतर म्हणून घेतलेल्या लेखात त्या बाबी आपोआप येतील. प्रसाद साळवे ०१:५४, ३० एप्रिल २०१७ (IST)Reply

बखरी व पेशवेकालीन लेखनाबद्दल

संपादन

दुसरे दिवशी पेशव्यांनीं तेथोन कुच करून मुळा नदीस मुकामास आले. आणि पुढें न जातां परत ब्राम्हणवाड्यास आले. आणि जुनरास जाऊन फुलगावावर मुकाम झाला. तेथोन कुच करून पुन्हा सालप्याच्या घाटानें करनाटकांत जाण्याचा विचार ठरविला. कुच करून राजवाडीस मुकामास जावें असा विचार होता, तों प्रथम प्रहर दिवसाचे आंत नगराहून पुण्यास जाण्याकरितां इंग्रजाची फौज एक पलटण व दोनशें स्वार व दोन तोफा घेऊन कोरेगावास मुकामास आले. तेथून फुलगावीं एक कोसावरच पेशव्याचा मुकाम आहे हें त्यांस माहित नव्हते. व पेशव्यांकडील फौजेनें इंग्रजांकडील फौज कोरेगावावर आलेली पाहून त्यांजवर धावा केला. इतक्यांत त्या पलटणींतील साहेबांनी जलदी करून कोरेगावांतील दोनतीन वाड्यांत शिरून तोफ चालू करून पलटणी लोक फेरा मारू लागले. तेणेंकरून पेशवे याजकडील लोक अजमासे दीडशे व इंग्रजाकडीलही सुमारे चारशांवर मेले व जखमी झाले असतील. याप्रसंगी बापूसाहेबानीं बहूत शूरत्व केले. इंग्रजी फौज ही धैर्य धरून अस्तमानपर्यंत लढत होती, रात्र झाल्यावर पेशवे यांजकडील फौजेनें इंग्रजी फौजेला सोडून राजेवाडीस मुकामास गेले. '

( संदर्भ ग्रंथ :- सरदार बापू गोखलेच्या विषयी लिहिलेल्या दोन बखरींच्यापैकी विठ्ठल पुणेकर लिखित बखरीमधील हा उतारा आहे. सदर बखरीतील उतारे श्री. सदाशिव आठवले यांच्या ' सरदार बापू गोखले ' या ग्रंथात छापले आहेत. विठ्ठल पुणेकर यांनी बापू गोखले विषयीची बखर कधी लिहिली याविषयी माहिती मिळत नाही. त्यामुळे या बखरीत कोरेगाव येथील लढाईच्या संदर्भात जी काही माहिती आलेली आहे त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे एक कोडंच आहे.

  प्रसाद साळवे   १०:२३, ३० एप्रिल २०१७ (IST)Reply

महारांनी ब्रिटिश सैन्यात भरती होण्याची कारणे

संपादन

काही काळा पूर्वी इंग्रजांनी महारांना आमिष दाखविल्यामुळे महार ब्रिटिश सैन्यात भरती झाले अशा आशयाचा मजकूर संदर्भाशिवाय घातला गेला होता. त्यानंतर महार आत्मसन्मासाठी (<- मूळ शुद्धलेखन) ब्रिटिश सैन्यात दाखल झाले असा मजकूर घातला गेला.

दोन्ही ठिकाणी व्यक्तिगत दृष्टिकोनातून लिहिला गेलेला मजकूर वगळला आहे.

अभय नातू (चर्चा) ००:१६, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

साम्राज्य

संपादन

@अभय नातू:, तुम्ही या पानावरील सदस्य:मराठा अभिषेक चे संपादन का नाही हटवले. त्याने माहितीचौकटही बदलली तुम्हाला ते ही का बललाव वाटलं नाही ??? आणि पेशव्यांच्या सैन्यात बहुतांश मराठा होते हे याचा तुम्हाला संदर्भ हवाय का? अहो, पेशवे जे साम्राज्य चालवित होते ते मराठा साम्राज्य होते, त्यात मराठा असणारच ना... पेशवे फक्त त्यांचे नेतृत्व करत. --संदेश हिवाळेचर्चा ००:१९, ३० डिसेंबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ००:१९, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

@संदेश हिवाळे:
अभिषेकचे कोणते संपादन? वर लिहिल्याप्रमाणे इंग्रजांनी आमिष दाखवले हे लेखन हटविलेच आहे.
पेशव्यांच्या सैन्यात मराठेच असणार हे तुम्ही गृहित धरता. पेशव्यांकडे फ्रेंच, गारदी, ब्राह्मण, वैश्य आणि इतर अनेक जातींचे सैनिक होते हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. त्यातूनही बव्हंश मराठा असणार हे कदाचित खरे असेल परंतु त्यावरुन इतके मनाला लावून घेऊ नये.
मी काढलेला महार आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांना जाउन मिळाले या आशयाचा मजकूर (संदर्भाशिवाय) बद्दल तुमचा विरोध नाही असे समजतो.
अभय नातू (चर्चा) ००:३१, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply
ता.क. तुम्ही दिलेला संदर्भ ब्लॉग आहे. असा संदर्भ ग्राह्य नाही.
तुमच्या उत्तराची किंवा इथर संदर्भाची काही काळ वाट पाहून तो मजकूर पुन्हा हटवीत आहे.
अभय नातू (चर्चा) ००:३३, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

सदस्य:मराठा अभिषेक ने दोनदा संपादन केले, त्यांचे दुसरे संपादन पहा - माहितीचौकट साच्यात बदल केला होता. तुम्ही लेखात एकेरी पद्धतीने काटछाट केली म्हणून मजकूर परत चढवला आहे. पेशव्यांच्या मराठा साम्राज्यातील बहुतांश सैन्यांना मराठा नमूद करावे असा माझाही हट्ट नाही.

बीबीसी मराठी चा संदर्भ ब्लॉग आहे का? --संदेश हिवाळेचर्चा ००:३९, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

--संदेश हिवाळेचर्चा ००:३९, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply
अभिषेकचा दुसरा बदल लवकरच बघतो. आज केलेला बदल दिसला म्हणून त्याकडे लक्ष दिले.
बीबीसी मराटीवरचा संदर्भ ब्लॉगच आहे. त्याचे शीर्षक आहे - ब्लॉग : भीमा कोरेगावात जमणाऱ्या....
हा सुद्धा काढायलाच हवा.
अभय नातू (चर्चा) ००:४३, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

सदस्य-अभिषेक ने दोन्ही संपादने एखाच दिवशी व एकाच वेळी केलेले होते. बीबीसी संदर्भ हटवेन. --संदेश हिवाळेचर्चा ०१:१६, ३० डिसेंबर २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा ०१:१६, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

मी तुमच्या आजच्या एका संपादनापासून पाहण्यास सुरुवात केली, जो प्रस्तावनेत होता.
असो. दोन्ही बदल परतवले आहेत.
१. साच्यात ब्रिटिशांचा विजय असे केले आहे. ही फौज ब्रिटिशांनी उभारली होती, महारांनी नव्हे. १८५७ पर्यंत (आणि त्यानंतरही बराच काळ) ब्रिटिशांच्या भारतातील फौजेत बव्हंश एतद्देशीय सैनिक असले तरी ती ब्रिटिश फौज या नावानेच ओळखली जाते. त्यानंतर आंग्ल-अफगाण युद्धात तसेच विसाव्या शतकात पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या डझनावारी रेजिमेंटांमध्ये भारतीय सैनिक लढले (अनेकांना त्याबद्दल गौरवही मिळाले) परंतु त्या सगळ्या रेजिमेंटा ब्रिटिश फौजेच्याच होत्या. १७६८मध्ये उभारलेली मराठा लाइट इन्फंट्री ही भारतीय लष्कराची सगळ्यात वरिष्ठ रेजिमेंट याचे उत्तम उदाहरण आहे.
वर चर्चा झाल्याप्रमाणे महारांनी आत्मसन्मानासाठी ब्रिटिश फोज भरती केली या आशयाच्या वाक्याला असलेला बीबीसीवरील ब्लॉगचा संदर्भ काढला व हे वाक्य संदर्भाशिवाय असल्याने काढले.

अभय नातू (चर्चा) ०४:४९, ३० डिसेंबर २०१७ (IST)Reply

बाह्य दुवे आणि संदर्भ

संपादन

लेखांमध्ये केलेल्या विधानांना विशिष्ट पुरावा म्हणून संदर्भ दिले जातात. बाह्य दुवे हे त्या लेखातील विषयावर अधिक माहितीसाठी दिले जातात. बाह्य दुव्यांमध्ये अनेक संदर्भ आहेत (आणि वाचकाने ते शोधून घ्यावेत) असे लिहिणे चुकीचे आहे. जर एखाद्या विधानाला संदर्भ असेल तर तो तेथे द्यावा. तसे नसल्यास असे विधान वगळले जाण्याची शक्यता असते. वारंवार लिहिलेल्या/खोडलेल्या विधानांना हे विशेष लागू पडते.

अभय नातू (चर्चा) ०४:११, ३१ डिसेंबर २०१७ (IST)Reply


पेशवाई काळातील अस्पृश्यता व अस्पृश्यांना (दलित) हीन वागणूक व याचा विरोध म्हणून महारांची पेशव्यांशी लढाई यांविषयी अनेक देशी-विदेशी लेखकांनी लिहिले आहेत, याचे संदर्भ देऊन परत लिहतो. धन्यवाद.

--संदेश हिवाळेचर्चा ११:४३, ३१ डिसेंबर २०१७ (IST)Reply

हे संदर्भ व्यक्तिगत मते वाटतात परंतु तसे सिद्ध होईपर्यंत मजकूर आणि संदर्भ दोन्ही ठेवले आहेत.
येथे अस्पृश्यता होती किंवा नव्हती याबद्दल वाद नसून या संदर्भाच्या लेखकांनी अस्पृश्यतेचा विरोध म्हणून महार ब्रिटिश सैन्यात दाखल झालेले कसे कळले हा प्रश्न आहे. सगळ्या संदर्भात याबद्दल एकही ऐतिहासिक पुरावा नाही.
अभय नातू (चर्चा) ००:५३, १ जानेवारी २०१८ (IST)Reply
'अस्पृश्यतेचा विरोध म्हणून महार ब्रिटिश सैन्यात दाखल झाले' हे माझे व्यक्तीगत मत नसून मी ते अनेक वेळा वाचले व ऐकले आहे, एक डॉक्यमेंटी संदर्भ जोडतो.

--संदेश हिवाळेचर्चा ०७:०५, १ जानेवारी २०१८ (IST)Reply

कृपया संदेश नीट वाचा. तुमच्या नाही, तर संदर्भातील लेखकांच्या व्यक्तिगत मताबद्दल बोलत आहे. आता द्याल तो संदर्भ ऐतिहासिक असला तर उत्तम. दोन्हीकडून बोलणारे ब्लॉग सतराशे साठ आहेत. त्यांचा काडीमात्र उपयोग नाही.
आत्ता दिलेला यूट्यूबवरील व्हिडियोला ऐतिहासिक संदर्भ काय आहेत? व्हिडियो कोणी तयार केला? असे मोघम संदर्भ दिल्याने ऐकीव माहिती खरी ठरत नाही.
अभय नातू (चर्चा) ०८:०२, १ जानेवारी २०१८ (IST)Reply

इतर संदर्भ शोधतो. --संदेश हिवाळेचर्चा ०९:०८, १ जानेवारी २०१८ (IST)Reply

हे पहा काय कामाचे आहे काय बघा, संदर्भासाठी.[१].[२] .----Sachinvenga (चर्चा) १२:५९, १ जानेवारी २०१८ (IST)Reply

याच्या बद्दल करणे ताबडतोब थांबवावे

संपादन

खरा इतिहास लपवून खोटा लोकांना सांगण हे मनवाद्यांच पूर्वी पासूनच चालत आलेले तेव्हा हे इथेच थांबवा Kamble50 (चर्चा) ०६:५३, ४ जानेवारी २०१८ (IST)Reply

शिर्षक

संपादन

@: शिर्षक का बदलले ?? या कोरेगावचे अधिकृत मूळ नाव तुम्हाला माहिती आहे का? --संदेश हिवाळेचर्चा १४:२६, ४ जानेवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १४:२६, ४ जानेवारी २०१८ (IST)Reply

@संदेश हिवाळे:,
ज यांना संदेश पाठविलात हे बरे केलेत. त्यांचे उत्तर येईपर्यंत वाट पाहिली असती तर ते अधिक चांगले दिसले असते.
असो आता जंच्या उत्तरानंतर पुन्हा स्थानांतर करणे उचित असेल तर ते करालच.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १४:४२, ४ जानेवारी २०१८ (IST)Reply
क्षमस्व, शिर्षक बदलण्याची घाई केली म्हणून. परंतु मी गावाचे अधिकृत नाव दोन ठिकाणी पाहिले. १ मुख्य रस्त्यावर गावाची पाटी लावलेली आहे व तेथिल ग्रामपंचायतीचा ठराव पाहिला, ज्यात ग्रामपंचायतीचा फॉर्म व शिक्क्यात कोरेगाव भिमा असाच गावचा उल्लेख आहे. इंग्रजी विकिपीडियावरही या गावचा लेख आहे Koregaon Bhima. गावची पाटी, ग्रामपंचायतीचा अधिकृत फॉर्मचा फोटो पण आहे माझ्याकडे, व्हॉट्सएपवर पाठवू शकतो.

--संदेश हिवाळेचर्चा १४:४९, ४ जानेवारी २०१८ (IST)Reply

फेसबूकवरील दुवा येत नाही आहे. कसेही असता फेसबूकवरील संदर्भ देऊ नये. तसेच छायाचित्र कॉमन्सवर चढवून त्याचा दुवा द्यावा.
तुमच्याकडील ग्रामपंचायतीच्या फॉर्मचे छायाचित्र कॉमन्सवर चढवले तर उत्तमच.
अभय नातू (चर्चा) १४:५१, ४ जानेवारी २०१८ (IST)Reply

वरील फार्म वाचताना गावाचे नाव व गावाचा शिक्का विचारात घ्या. --संदेश हिवाळेचर्चा १५:०३, ४ जानेवारी २०१८ (IST)Reply

धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १५:०४, ४ जानेवारी २०१८ (IST)Reply

सध्या या गावाची समस्त भारतात चर्चा आहे, लोकसभा व राज्यसभेतही. त्यामुळेच गावाचे अधिकृत नाव अचानकपणे कळू शकले. --संदेश हिवाळेचर्चा १५:१५, ४ जानेवारी २०१८ (IST)Reply


चूक झाली, पण ती लक्षात आल्याबरोबर दुरुस्तीचा प्रयत्न केला, पण अचानक वीज गेल्यामुळे करता आले नाही. ... (चर्चा) २०:५९, ४ जानेवारी २०१८ (IST)Reply

इंग्रजी विकिपीडियावरही या गावचा Koregaon Bhima नावाचा लेख आहे म्हणून गावाचे नाव भिमा होत नाही. जोपर्यंत अर्थाचा अनर्थ होत नाही तोवर इंग्रजीत विशेष नावांच्या स्पेलिंगमध्ये र्‍हस्व किंवा दीर्घ ई करता 'i' हेच एकमेव अक्षर येते. सु्शीला (स्पेलिंग Sushila), भीमा नदी (स्पेलिंग Bhima River), वाल्मीकि (स्पेलिंग Valmiki), वगैरे. आणि ग्रामपंचायत गावाचे नाव बरोबर लिहील याची शाश्वती नाही. वर्तमानपत्रांतून व दूरचित्रवाणीवर अनेकदा या गावाचे नाव आले, कोठेही ते भिमा असे मला तरी दिसले नाही. ... (चर्चा) २१:१९, ४ जानेवारी २०१८ (IST)Reply


भीमा कोरेगाव म्हणणारे, लिहिणारे माझ्याशिवाय इतर अनेकजण आहेत. लोकसत्ताच्या चार जानेवारीच्या अग्रलेखात भीमा कोरेगाव असाच उल्लेख आहे. ... (चर्चा) २२:२५, ४ जानेवारी २०१८ (IST)Reply

-- आणखीही बातम्यांत भीमा कोरेगाव आहे. उदा० लोकसत्तेतील ही बातमी :- आणि एकबोटेंना अटक करायची सोडून

[३]

[४]

पॅंथरकडून ठाण्यात ’रेल रोको’चा प्रयत्न

[५]

[६]

[७]

कदाचित ही सर्व मंडळी बरोबर असतील आणि ग्रामपंचायत चूक असेल!.... (चर्चा) ००:३४, ५ जानेवारी २०१८ (IST)Reply

@अभय नातू: तुम्ही वर तुमच्याकडील ग्रामपंचायतीच्या फॉर्मचे छायाचित्र कॉमन्सवर चढवले तर उत्तमच असे म्हणतात कृपा स्पस्ट करा की फॉर्मचे छायाचित्र कॉपीराईट मुक्त आहे का? --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 ०९:००, ५ जानेवारी २०१८ (IST)Reply

@Tiven2240:,
जर चित्र हिवाळे यांनी स्वतः काढले असेल आणि फेर यूझचे नियम पाळले असतील तर ते प्रताधिकार मुक्त ठरेल
अभय नातू (चर्चा) १७:०५, ५ जानेवारी २०१८ (IST)Reply
"कोरेगावची लढाई" पानाकडे परत चला.