चर्चा:एकनाथ पवार
प्राथमिक माहितीसाठी तक्ता दयावे. उदाहरणार्थ - नाव : जन्म : ठिकाण : चित्रपट : प्राप्त पुरस्कार : विशेष : प्रकाशित साहित्य : साहित्य लेखनाची भाषा : अशा स्वरूपाचे तक्ते दिल्यास लेखाची मांडणी अधिक सुंदरतेने करता येईल.
प्राथमिक माहितीसाठी तक्ता देण्यात यावे.
संपादनलेखामध्ये तक्ता दिल्यास सदर साहित्यिक, चित्रपट गीतकार विषयीचे लेख अधिक सुंदर दिसू शकते.उदाहरणार्थ नाव | जन्म | ठिकाण | चित्रपट | प्राप्त पुरस्कार | विशेष | साहित्य लेखनाचे प्रकार | प्रकाशित साहित्य | इतर Govr1 (चर्चा) ११:०८, ३० ऑक्टोबर २०२१ (IST)
- @Govr1: झाले. त्याला माहितीचौकट असे म्हणतात. माहितीचौकट जोडली.- संतोष गोरे ( 💬 ) १३:१६, ३० ऑक्टोबर २०२१ (IST)
आपले मनापासून आभार.! Govr1 (चर्चा) १६:३५, ३० ऑक्टोबर २०२१ (IST)
सदर लेखात चित्र जोडून सहकार्य करावे
संपादनसदर लेखात चित्र जोडता आले नाही. चित्र जोडल्यास लेख पूर्णपणे संपादन केल्याचे समाधान होईल. कृपया सदर लेखात चित्र जोडून सहकार्य करावे. सबंधित चित्र संदर्भातील Eknath Pawar filmography यावर उपलब्ध आहे.-Govr1 (चर्चा) ०७:५१, १७ नोव्हेंबर २०२१ (IST)
- चित्र कुठे आहे? कृपया लिंक द्यावी. - संतोष गोरे ( 💬 ) ०८:२५, १७ नोव्हेंबर २०२१ (IST)
सहकार्याबद्दल धन्यवाद.
https://www.indianfilmhistory.com/details-lyricist/eknath-pawar - Govr1 (चर्चा) १७:२६, १७ नोव्हेंबर २०२१ (IST)
- दुसऱ्या संकेतस्थळावरील चित्र येथे घेता येत नाहीत. प्रताधिकार कायद्याचा भंग होतो. https://commons.wikimedia.org वर आपण स्वतः काढलेले चित्र जोडू शकतो. चित्र जर स्वतः काढलेले नसेल तर, चित्रकारा कडून चित्र अधिभारीत करावे. - संतोष गोरे ( 💬 ) २३:२०, १७ नोव्हेंबर २०२१ (IST)
धन्यवाद. Govr1 (चर्चा) २३:४०, १७ नोव्हेंबर २०२१ (IST)
https://commons.m.wikimedia.org/wiki/File:Eknath_Pawar_Writer_and_Poet.jpg
या लिंकवर चित्र उपलब्ध आहे, कृपया ते जोडावे. सहकार्य करावे. धन्यवाद Govr1 (चर्चा) ००:३८, १८ नोव्हेंबर २०२१ (IST)
- @Govr1:
- पुन्हा एकदा आठवण करुन देतो की मराठी विकिपीडिया पूर्णपणे स्वयंसेवी संपादक चालवितात. तुम्ही मीडियाविकिवरील चित्र कसे लेखात घालावे याची जाणकारी चित्र असलेल्या इतर लेखांवरुन करुन घ्या.
- तुम्ही इतरत्र मराठी विकिपीडियाशी भांडणाचा सूर लावलेला दिसतो आणि नंतर तेथे मदतीची ही हाक घालता. हे विसंवादी आहे.
- आपली मदत आपणच करुन घ्यावी, विशेषतः सारखी लागत असल्यास. सुरुवातीची मदत आणि क्लिष्ट गोष्टींमध्ये लागणारी मदत करण्यास इतर तयार आहेतच हे पुन्हा एकदा सांगू इच्छितो.
- अभय नातू (चर्चा) ११:१९, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)
ज्या संपादन लेखावर जी भूमिका असेल, त्यानुसार भूमिका आहे. याचा अर्थ आपण कोणतेही साचे लावल्यास मी माझी भूमिका मांडणार. मग चर्चा कशासाठी आहे. सहकार्याची भूमिका नसेल तर तो तुमचा विषय आहे. माझी भूमिका संवादी आहे आणि निरपेक्ष आहे. इतर कोणी सहकार्य करीत असेल तर, आपण त्याला दुजोरा देणे अपेक्षित आहे. Govr1 (चर्चा) १८:५९, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)
- भाऊ,
- येथे अनेक संपादक काम करतात. बव्हंश एकमेकांना मदत करतात. परंतु कोठेही मला हे करुन पाहिजे, ते करुन पाहिजे या सततच्या मागण्या दिसत नाहीत. एक-दोनवेळा मदत मिळाल्यावर प्रत्येकजण आपला वेळ स्वतःच्या (असला तर संकुचित) हेतूबाहेर घालवून येथील सोप्या गोष्टी शिकून घेतो.
- तुम्हाला मात्र इतरांना वेठीस धरावयाचे आहे असे वाटते. येथे कोणीही पगारी नोकर नाहीत. स्वतःचे काम स्वतः शिकून करुन घेणे हाच मार्ग आहे. कृपया तो चोखाळावा.
- आणि येथे मदतीची मागणी करण्याबद्दल लिहिले आहे. साच्यांबद्दल नाही. एक चर्चा तिसरीकडे नेऊ नये ही (पुन्हा एकदा) विनंती.
- मराठी विकिपीडिया आणि एकूणच विकिपीडियावरील संकेत, नियम वाचून आत्मसात करावे ही सुद्धा (आता आग्रहाची) विनंती.
- अभय नातू (चर्चा) २२:४१, १९ नोव्हेंबर २०२१ (IST)