चर्चा:इस्रायल

(चर्चा:इस्रायेल या पानावरून पुनर्निर्देशित)

इस्रायेल/ इस्राइल/ इस्राएल??? संपादन

योग्य नाव काय आहे? इस्रायेल/ इस्राइल/ इस्राएल???

मराठीत इस्राइल असा शब्द बहुतांश वृत्तपत्रांत रूढ आहे.

संकल्प द्रविड 18:51, 19 ऑगस्ट 2006 (UTC)

मलाही इस्राइल हे जास्त सयुक्तिक वाटते.
Amit (अमित) 08:14, 22 ऑगस्ट 2006 (UTC)


हिब्रू भाषेत "इस्राएल" असा उच्चार आहे. इस्रायली लोक "इस्राएल" उच्चार करतात हे इस्राएल मध्ये मी स्वतः अनुभवलेले आहे. (क्वचित कोणी "इस्रेऽल" असा is-rail ला जवळ जाणारा (बहुदा अमेरिकन) उच्चार करतात).
पण मराठीत "इस्रायल" आणि "इस्राइल" हे्ही मी वाचलेले आठवतात. महाराष्ट्रात अनेक मराठी ज्यू लोक आहेत. त्यापैकी कोणाला विचारता आले तर छान संदर्भ मिळेल.
"इस्राइल" हा रूढ शब्द असेल तर मात्र तोच वापरावा. काही संदर्भ मिळाले तर पाहतो.
पाटीलकेदार 13:20, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)


आपण उच्चारण इस्राईल असे करतो,निदान मी तरी! महाराष्ट्र एक्सप्रेस 14:44, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

इस्राएल संपादन

Support इस्राएल or इस्रायेल, again from personal experience.

अभय नातू 20:30, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

I support इस्राएल, if we cannot find another popularly used Marathi spelling.
पाटीलकेदार 20:42, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

अजून एक भर: 'इझ्त्राएल' (संदर्भ: मराठी विश्वकोश) संपादन

या चर्चेकरिता संदर्भ शोधत असताना अजून एक पर्यायी लेखन आढळून आले: इझ्त्राएल (संदर्भ: 'महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ' यांनी प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोश शीर्षकांची सूची - (खंड २) (PDF फाईल)

'मराठी विश्वकोश' हा उपक्रम तज्ञ मंडळींच्या सहभागातून घडला आहे. त्यामुळे त्यातील मत दुर्लक्षित करता येणार नाही. माझ्याकडे विश्वकोशाचा सध्यातरी पहिलाच खंड आहे. कुणाकडे याचा खंड क्र. २ असेल/ कुठूनतरी मिळू शकत असेल तर मजकूर वाचून खात्री करून घेऊ शकतील का?

--संकल्प द्रविड 06:12, 1 डिसेंबर 2006 (UTC)

परंतु आम-जनता हा शब्द वापरत नाही. त्यामुळे मुख्य लेख इझ्त्राएलवर ठेवावा व इतर उच्चार redirect करावेत.महाराष्ट्र एक्सप्रेस 06:20, 1 डिसेंबर 2006 (UTC)
प्रत्यक्ष विश्वकोशात काय लिहिले आहे ते जाणण्यास मी उत्सुक आहे. त्या PDF फाइल मध्ये चूक असू शकते. आताच मी "इंफाळ" ला "इफाळ" असे लिहिलेले त्यात पाहिले. ("इफाळ" असे जगात कुठे ठिकाण असेल तर क्षमस्व).
तसेच, "त्र" ला माझा विरोध आहे. हिब्रू भाषेतल्या मूळ उच्चाराला कितीही ओढले-ताणले तरी "स्र" चा "स्त्र" (किंवा "झ्र" चा "झ्त्र") करावा हे पटत नाही. (जरी विश्वकोशात असले तरीही).
पाटीलकेदार 07:52, 1 डिसेंबर 2006 (UTC)
हिब्रूमधील मूळ उच्चार माझ्या मते महत्वाचा नाही. इस्राइल हे मूळ उच्चाराचे मराठीकरण समजावे. ज्याप्रमाणे आपण कन्नडला कानडी म्हणतो (जरी कोणीही कानडी माणूस असा उच्चार करीत नसला तरीही) तसाच नियम इस्राइलला लावावा.
Amit (अमित) 15:56, 6 डिसेंबर 2006 (UTC)
This debate has happend more than once on Marathi wikipedia. See फ्रांस vs फ्रान्स.
We should stick as close to original pronunciations as possible. After all, if you do not like Mumbai pronounced as Bombay, why would you presume Israelites would not care our mangling of their country's name?
Again, there has to be a balance in the approach. Paris should be prounounced पॅरिस, rather than पॅरि (original french pronunciation). When in doubt, fall back to the original.
अभय नातू


बदल संपादन

या लेखात नुकतेच करण्यात आलेले बदल कृपया उलटवा.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:५५, ६ एप्रिल २०१० (UTC)

"इस्रायल" पानाकडे परत चला.