चर्चा:अरुणोदय (वृत्तपत्र)

Latest comment: ३ वर्षांपूर्वी by Sandesh9822

@Tiven2240:,

तुम्ही या लेखाला ब्लॉग म्हणून पानकाढा साचा लावलात. वस्तुतः येथे विश्वकोशीय माहिती आढळून येते. लेखनाची शैली नक्कीच बदलून विश्वकोशीय करता येईल तरी हे पान काढू नये तर त्यात बदल करावेत असे मला वाटते.

त्यासाठी मी तेथील साचा बदलला आहे. तुमचे मत कळवावे.

अभय नातू (चर्चा) १८:४०, २३ मे २०२० (IST)Reply

@अभय नातू: तुमच्या मातीशी सहमत आहे. लेखात जर जास्त स्रोत जोडले की ते अधिक विश्वकोशनिय होईल अशी अपेक्षा. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १९:०३, २३ मे २०२० (IST)Reply
@Tiven2240:,
आत्ताच सदस्य Bencemac यांनी उल्लेखनीयता रद्दीकरण या वर्गातील पानांचे लवकरात लवकर निकाल काढण्याचा आग्रह केला आहे. त्याबद्दलची चर्चा माझ्या चर्चापानावर वाचालच परंतु मथितार्थ आहे की ही पाने एकदा नजरेखालून घातल्याशिवाय काढू नयेत नाहीतर मराठी विकिपीडियावरील (आधीच थोडकी असलेले) ज्ञान विनाकारण नाहीसे होईल. अरुणोदय (वृत्तपत्र) त्यातीलच एक.
तरी या वर्गातील पानांचे निरीक्षण करण्यास तुमची मदत हवी आहे.
सदस्य पाने - ही पाने उल्लेखनीय असण्याचे कारण नाही तरी ती राहू द्यावीत, आणि कारण देउन साचा काढावा. मी एक उदाहरण देऊ केले आहे.
इंग्लिश शीर्षक - जर अशा इंग्लिश शीर्षकांना जोडलेली पाने असतील तर अशा पानांवर त्यांचे मराठी दुवे द्यावे. अशी जोडलेली पाने निघाली की इंग्लिश शीर्षकाची पाने मी वगळेन.
विश्वकोशीय मजकूर परंतु अविश्वकोशीय शैली असलेली पाने - यांवरील उल्लेखनीयता साचा काढून बदल साचा लावावा.
मी A पासून सुरुवात केलेली आह तुम्ही जर या वर्गाच्या शेवटापासून सुरुवात केलीत तर दोघांनी मिळून हे काम लवकर होईल.
अर्थात, हे पान एकटाकी, एका दिवसात होण्यासारखे नाही हे ठाउक आहेच.
अभय नातू (चर्चा) १९:१०, २३ मे २०२० (IST)Reply

@अभय नातू आणि सुबोध कुलकर्णी: अरुणोदय बद्दल एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा लेखात दिसत नाही तो म्हणजे त्याची भाषा. हे दैनिक कोणत्या भाषेत प्रकाशित होत होते? याशिवाय माहितीचौकट व काही संदर्भ जोडले तर हा लेख समृद्ध होईल. --संदेश हिवाळेचर्चा १९:३७, २३ मे २०२० (IST)Reply

माझ्या माहितीनुसार हे मराठी वृत्तपत्र होते. समकालीन संदर्भ मिळणे कठीण असले तरी इतर संदर्भ मिळू शकतील. जसजसे मिळतील तसतसे घालत जावे.
अभय नातू (चर्चा) १९:४०, २३ मे २०२० (IST)Reply
समकालीन संदर्भ नसले तरी इतर संदर्भही चालतील. मी काही ठिकाणी संदर्भ साचे जोडले आहेत.--संदेश हिवाळेचर्चा १९:४६, २३ मे २०२० (IST)Reply
"अरुणोदय (वृत्तपत्र)" पानाकडे परत चला.