चर्चा:अजिंठा (लेणी)
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by Mahitgar in topic लेखांचे स्वतंत्र स्वरुप
या पानावरील मजकूर अजिंठा-वेरूळची लेणी लेखात विलीन करण्यात यावा.
अभय नातू (चर्चा) ११:५७, २६ एप्रिल २०१२ (IST)
अजिंठा व वेरुळ लेण्या संदर्भातील अजिंठा-वेरूळची लेणी हा लेख आहे, तथापी अजिंठा व वेरुळ या दोणही लेण्या वेगवेगळ्या आहेत. दोनही लेण्या औरंगाबाद जिल्हयात येत असल्यामुऴे त्यांचा एकत्रित उल्लेख केला जातो. दोन वेगवेगळे लेख केल्यास योग्य राहील. किंवा या लेखास अजिंठा-वेरूळची लेणी लेखात विलीन करण्यात यावा, जे वाचकाना सोईचे ठरेल. --रविकुमार बोडखे (चर्चा) १४:५५, २० नोव्हेंबर २०१२ (IST)
- रविकुमार बोडखे,
- नमस्कार, तुम्ही मांडला तो मुद्दा ज्ञानाशी संबंधित, विश्वकोषाला साजेलशी पाने तयार व्हावीत यासाठीचा आहे. हे मी जाणतो पण मराठी विकिपीडियावरील व्यूहरचना तुम्हाला कळणार नाही. तुम्ही साहजिकच महाराष्ट्रात राहत असणार व तुम्हाला अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी या दोहोतील फरक कळतो हे तुमचे भाग्य पण ज्यावेळी कुणी परकिय या लेण्यांचा उल्लेख करतो त्यावेळी तो अजिंठा-वेरूळची लेणी असाच उल्लेख करतो. तुमच्या ज्ञानाला माझा सलाम. पण येथे तुमचे कुणी ऐकेल असे वाटत नाही यापूर्वीही एका सदस्याने ही दोन्ही पाने वेगळी असावीत यासाठी प्रयत्न केला होता त्या प्रयत्नाचे काय झाले हे तुम्ही येथे पाहू शकता. निराश होऊ नका त्या सदस्यासारखेच तुमचे ज्ञान येथे देत राहा. अशोक जगधने (चर्चा) १९:५२, २० नोव्हेंबर २०१२ (IST)
- सध्या मी विवीध वाद निवारणात गुंतलो आहे. टाळण्या जोगे असतील तेवढे वाद सध्या टाळूयात. इंग्रजी विकिपीडियावर सुद्धा अजिंठा आणि वेरूळ दोन्ही लेख भरपूर मजकुरानिशी वेग्वेगळे आहे हे दिसतेच आहे. कुणी दोन्ही लेखात पुरेशा मजकुरासहीत लेखन करणार असतील तर लेखाचे विभाजन करण्यास हरकत नाही.नवे दोन्ही लेख दर्जेदार होई पर्यंत जुना एकत्रित लेख समांतर तसाच राहू द्यावा, त्यानंतर हिस्टॉरीकल रेकॉर्ड/मेमरी करता आपण तो विकिपीडीया नामविश्वात स्थानांतरीत करूयात. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २३:१४, २० नोव्हेंबर २०१२ (IST)
लेखांचे स्वतंत्र स्वरुप
संपादनअजिंठा-वेरूळची लेणी या लेखात वेरूळ लेण्यांचा सविस्तर विचार आहे. त्यामुळे हा लेख रद्द करून त्या मोठ्या लेखात वर्ग करावा असे वाटते.आर्या जोशी (चर्चा)
- अजिंठा (लेणी) आणि वेरूळ (लेणी) या लेण्या स्वतंत्र असल्यामुळे दोन्ही लेख स्वतंत्र असणार आहेत. आणि तेच मुक्य लेख असणार आहेत.
- अजिंठा-वेरुळची लेणी हा लेख मुखपृष्ठ सदर राहुन गेल्यामुळे रेकॉर्डपरपज करता ठेवला आहे, भविष्यात किंवा कन्फ्युजन खुप वाढल्यास विकिपीडिया नामविश्वात नेऊन जतन करता येईल सामायिक लेखाचे सध्या अभिप्रेत स्वरुप अजिंठा (लेणी) आणि वेरूळ (लेणी) या लेखांवर बेतलेला असेल असे आहे.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:४८, ५ मे २०१७ (IST)