गौतम राजाध्यक्ष (१६ सप्टेंबर, इ.स. १९५०; मुंबई, महाराष्ट्र - १३ सप्टेंबर, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी फॅशन प्रकाशचित्रकार होते. व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत.

गौतम राजाध्यक्ष
जन्म गौतम
१६ सप्टेंबर, इ.स. १९५०
मुंबई
मृत्यू १३ सप्टेंबर, इ.स. २०११
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा फॅशन प्रकाशचित्रकार
कारकिर्दीचा काळ इ.स. १९८० ते इ.स. २०११
प्रसिद्ध कामे हिंदी / मराठी चित्रपटातील नट आणि नट्यांची प्रकाशचित्रे
धर्म हिंदू
नातेवाईक शोभा डे

जाहिरात क्षेत्रातल्या लिंटास इंडिया लिमिटेड या तत्कालीन अग्रगण्य कंपनीच्या फोटो-सेवा विभागात इ.स. १९७४ साली रुजू झाल्यापासून राजाध्यक्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीस आरंभ झाला. इ.स. १९८०च्या सुमारास शबाना आझमी, टीना मुनीम, जॅकी श्रॉफ या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्यांची त्यांनी काढलेली व्यक्तिचित्रे प्रकाशझोतात आल्यापासून त्यांच्या व्यक्तिचित्रात्मक प्रकाशचित्रणास प्रसिद्धी लाभली.

बाह्य दुवे

संपादन