गोल्डन चॅरियट ही भारतीय रेल्वेची एक आलिशान पर्यटन प्रवासी रेल्वेगाडी आहे. ही गाडी दक्षिण भारतामधील कर्नाटक, गोवा, केरळ, तामिळनाडूपुडुचेरी ह्या राज्यांतून धावते. जांभळ्या व सोनेरी रंगांत रंगवलेली ही १९ डब्यांची गाडी २००८ सालापासून चालू आहे. पॅलेस ऑन व्हील्सडेक्कन ओडिसीच्या धर्तीवर प्रवाशांना आरामदायी व आलिशान सेवा पुरवणारी गोल्डन चॅरियट कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळाद्वारे चालवण्यात येते.

The Golden Chariot Express

मार्ग

संपादन

गोल्डन चॅरियटचे दोन मार्ग आहेत. दोन्ही प्रवास कार्यक्रम ८ दिवस व ७ रात्री चालतात.

स्प्लेंडर ऑफ द साउथ

संपादन

हा मार्ग दक्षिणेमधील प्रमुख शहरांमधून फिरतो. बंगळूर (पहिला दिवस), चेन्नई (दुसरा दिवस), पुडुचेरी (तिसरा दिवस), तंजावर (चौथा दिवस), मदुराई (पाचवा दिवस), तिरुवनंतपुरम (सहावा दिवस), अलेप्पीकोची (सातवा दिवस) व बंगळूरला परती (आठव दिवस) असा हा कार्यक्रम चालतो.

प्राईड ऑफ द साउथ

संपादन

हा मार्ग प्रामुख्याने कर्नाटकातच धावतो. बंगळूर (पहिला दिवस), म्हैसूर (दुसरा दिवस), नागरहोळे राष्ट्रीय उद्यान (तिसरा दिवस), हासन, बेलूरहळेबीडु (चौथा दिवस), हॉस्पेटहंपी (पाचवा दिवस), ऐहोळे, पट्टदकलबादामी (सहावा दिवस), गोवा (सातवा दिवस) व बंगळूरला परती (आठव दिवस) असा हा कार्यक्रम चालतो.

बाह्य दुवे

संपादन