गॉट्टहार्ड बेस बोगदा
(गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा या पानावरून पुनर्निर्देशित)
गॉट्टहार्ड बेस रेल्वे बोगदा हा स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतांतील बोगदा आहे. याच्या दोन टोकांतील अंतर ५७ किमी (३५ मैल) असून आतील बोगदे, जोडबोगदे व इतर रस्त्यांची एकूण लांबी १५२ किमी आहे.[१] हा जगातील सगळ्यात लांबीचा बोगदा आहे. यानंतरचा सगळ्यात मोठा बोगदा जपानचा सैकान बोगदा आहे.
चौदा वर्षे बांधकाम चाललेला हा बोगदा बांधण्यास १२ अब्ज २० कोटी स्विस फ्रँक खर्च आला.,[२] यात दोन एकमार्गी बोगदे व त्यांमधील जोडबोगदे आहेत. आल्प्सच्या आरपार रेल्वेमार्ग नेणारा हा बोगदा आल्पट्रांझिटचा भाग आहे. १ जून, २०१६ रोजी या बोगद्यातून रेल्वे वाहतूक सुरू झाल्यावर १८८१मध्ये बांधलेला गॉट्टहार्डबाह्न या अवघड मार्गाची गरज उरली नाही.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;Project data
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ "The Costs". 2010-10-15 रोजी पाहिले.[permanent dead link]