गुलजार
+गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे. भारतातील एक कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अश्या बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलज़ार यांचा जन्म ऑगस्ट १८, १९३६ रोजी पंजाबमधील दीना येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे. [१]
बालपण
संपादनगुलजार यांना लहानपणापासून गीतांच्या भेंड्यांमध्ये भाग घ्यायला आवडत असे. त्यावरून त्यांना पुढे कविता व नंतर उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात रस वाटू लागला. ते शेजाऱ्यांकडे जाऊन तंतुवाद्य वाजविण्याचा अभ्यास करीत. गुलजार जेव्हा महाविद्यालयात गेले तेव्हा ते नियमितपणे रविशंकर आणि अली अकबर खान यांच्यासारख्यांच्या वाद्यसंगीताच्या कार्यक्रमांना जाऊ लागले.
फाळणीनंतर
संपादनहिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर गुलजार यांचे कुटुंब फार वर्षे पाकिस्तानात राहू शकले नाही. ती मंडळी भारतात अमृतसरला आली आणि गुलजार मुंबईला. इथे ते एका मोटार गॅरेजमध्ये काम करू लागले, मुंबईत त्यांना हिंदी चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. फावल्या वेळात ते कविता करत. बिमल रॉय, हृषीकेश मुखर्जी आणि हेमंत कुमार यांना भेटून ते आपल्या कविता वाचून दाखवू लागले. परिणामी बंदिनी चित्रपटासाठी गुलजार यांनी ’मोरा अंग अंग लै ले, मुझे श्यामरंग दै दे’ हे गाणे लिहिले आणि ते बिमल रॉय यांचे पूर्णवेळचे असिस्टंट झाले. ते गाणे अतिशय लोकप्रिय झाले आणि गुलजार यांना जिकडे तिकडे गीतलेखनासाठी बोलावणी येऊ लागली.
नंतरच्या काळात गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी, असित सेन यांच्या चित्रपटांसाठीही गीते लिहिली.
गुलज़ार यांची गीतशैली
संपादनगुलज़ार हे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीसाठी ओळखले जातात. ज्या सामान्यतः गीतांमध्ये वापरल्या जात नाहीत, अश्या प्रतिमा गुलज़ार यांच्या गीतांमध्ये ठिकठिकाणी वापरलेल्या आढळतात.
उदाहरण म्हणून काही गीते :
- ”सत्या” चित्रपटील अतिशय लोकप्रिय गीत- "सपने में मिलती हैं!" हे गीत नावीन्यपूर्ण प्रतिमा वापरून अगदी हृदयंगम झाले आहे.
सारा दिन सडकों पे खाली रिक्षे सा पीछे पीछे फिरता हैं ।
- बंटी और बबली मधील
ऑंखें भी कमाल करती हैं पर्सनल से सवाल करती हैं. हे फक्त काही नमुने. गुलज़ार यांचे प्रत्येक गीत अशा प्रतिमांनी पुरेपूर असते.
- ओंकारामधील बीडी आणि नमक इश्क़ का
गुलज़ार-एक गीतकार
संपादनगुलज़ार यांनी पुढील चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत.
- आनंद (१९७०)
- ओंकारा(२००६)
- खामोशी (१९६९)
- गुड्डी (१९७१)
- जान-ए-मन(२००६)
- थोडीसी बेवफाई
- दो दूनी चार (१९६८)
- नमकहराम (१९७३)
- बंटी और बबली(२००५)
- बावर्ची (१९७२)
- सफर (१९७०)
गुलजार यांनी निर्माण केलेले चित्रपट
संपादन- अंगूर (१९८१)
- अचानक (१९७३)
- ऑंधी (१९७५)
- किनारा (१९७७)
- कोशिश (१९७२)
- खुशबू (१९७५)
- नमकीन (१९८२)
- परिचय (१९७२)
- मीरा (१९७९)
- मेरे अपने (१९७१)
- मौसम (१९७५)
- लेकिन (१९९०)
गुलजार यांची पुस्तके
संपादन- बोस्की (कवितासंग्रह)
- तक़सीम (हिंदी कथासंग्रह)
- देवडी (मूळ हिंदी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद-अनुवादक अंबरीश मिश्र)
- धुऑं ( हिंदी कथासंग्रह)
- मिर्झा गालिब (मराठी अनुवाद - अंबरीश मिश्र)
गुलजार यांना मिळालेले पुरस्कार
संपादन- साहित्य अकादमी पुरस्कार २००२ मध्ये धुऑं या कथासंग्रहासाठी
- पद्मभूषण पुरस्कार २००४ मध्ये
- ऑस्कर पुरस्कार जय हो या स्लमडॉग मिलेनिअर या गीताच्या लेखनासाठी
- दादासाहेब फाळके पुरस्कार (२०१३)
- 2023 सालचा 58 वा ज्ञानपीठ पुरस्कार गुलजार यांना उर्दूसाठी प्रदान करण्यात आला आहे. (२०२४ मध्ये)
(अपूर्ण)