गुरु ग्रंथ साहिब

(गुरुग्रंथ साहीब या पानावरून पुनर्निर्देशित)

गुरुग्रंथ साहेब (हिंदी: गुरुग्रंथ साहिब) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंग यांचा आदेश : 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)[][]

गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची गुरू गोविंदसिंग यांची प्रत, पाटणा. चित्रात दिसत असलेली अक्षरे मूलमंत्र नावाने प्रसिद्ध आहेत

या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात भारतातील अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी पंजाबी (गुरुमुखी), मराठी, ब्रज, अवध आदी बोलींनी सुशोभित आहे.[]

गुरुग्रंथ साहेबमधील विविध संतांचे शबद (रचना) :

[]

महत्त्व

संपादन

श्री गुरू ग्रंथ साहिब हा शिखांचा गुरू शब्द आहे. साहिब आणि श्री आदरणीय आहेत; गुरू हा शब्द गुरियाईचा वारस असण्याशी संबंधित आहे आणि आदि हा शब्दशः महिना किंवा पहिला आहे, जो या शास्त्राला दसम ग्रंथ, शिखांचा दुसरा पवित्र ग्रंथ, ज्यामध्ये दहावे गुरू गोविंद सिंग जी यांचे श्लोक आहेत, यापासून वेगळे केले आहे. गुरू ग्रंथसाहिबच्या ग्रंथांचे लेखक विविध वर्ग आणि संप्रदायांचे होते; त्यात हिंदू आहेत, मुस्लिम आहेत आणि नीच-उच्च जातीचे लोकही आहेत.


संत शबद (रचना)
कबीर दास २२४
नामदेव ६१
संत रविदास ४०
भगत त्रिलोचन जी
फरीद जी
भगत बैणी जी
भगत धंना जी
भगत जयदेव जी
भगत भीखन जी
सूरदास
भगत परमानन्द जी
भगत सैण जी
पीपाजी
भगत सधना जी
रामानंद
गुरू अर्जन देव

गुरुग्रंथ साहेबासंबंधी मराठी पुस्तके

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "नांदेड़ के हज़ूर साहिब गुरुद्वारे की कहानी, जहां से कई लोग कोरोना पॉजिटिव निकले" (हिंदी भाषेत). २१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Amritsar : 416 साल पहले आज के दिन स्वर्ण मंदिर में हुई थी "पवित्र ग्रंथ साहिब" की स्थापना, जानें इसकी अहमियत" (हिंदी भाषेत). २१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "जीवन की सही राह" (हिंदी भाषेत). २१ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "गुरुवाणी: संतो की वाणी है गुरु ग्रंथ साहिब, कबीर जी के भी हैं 224 शबद" (हिंदी भाषेत). २१ मार्च २०२१ रोजी पाहिले.


मागील:
गुरू गोविंदसिंग
गुरूग्रंथ साहेब
विद्यमान
पुढील:
-
 
शिखांचे अकरा गुरू

गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.)