गाढवाचं लग्न (नाटक)
गाढवाचं लग्न हे हरिभाऊ वडगावकर यांनी लिहिलेले मराठी भाषेतील प्रसिद्ध वगनाट्य आहे. या नाटकास भारतीय केंद्रशासनाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे[ संदर्भ हवा ].
गाढवाचं लग्न(वगनाट्य) | |
गाढवाचं लग्न | |
लेखन | प्रकाश इनामदार, हरिभाऊ वडगावकर ऊर्फ हरिभाऊ काशीकेदार, मूळ गाव - वडगाव आनंद, तालुका- जुन्नर , जिल्हा- पुणे |
भाषा | मराठी |
देश | भारत |
प्रकार | वगनाट्य |
निर्मिती | प्रकाश इनामदार |
दिग्दर्शन | प्रकाश इनामदार |
गीत | प्रकाश इनामदार |
संगीत | वसंत देव |
नृत्यदिग्दर्शक | जयमाला इनामदार |
नेपथ्य | बिभीषण, बापू |
प्रकाशयोजना | साई सिने सर्व्हीस. |
ध्वनिव्यवस्था | जॉन |
रंगभूषा | सुहास गवते |
वेशभूषा | शिवाजी कदम |
कलाकार | प्रकाश इनामदार, जयमाला इनामदार, प्रदीप खाडे, प्रदीप फाटक, अनुराधा कसबेकर, निखिल मेहंदळे |
या वगनाट्याचे सादरीकरण दादू इंदूरीकर यांनी केले होते, तर वगातील प्रमुख भूमिका राजा शंकरराव शिवणेकर, वसंत अवसरीकर, प्रभाताई शिवणेकर यांनी रंगवल्या होत्या. [ संदर्भ हवा ].
वगनाट्यात प्रभाताई शिवणेकर गंगीची भूमिका करायच्या. ’गाढवाचं लग्न’चे प्रयोग महाराष्ट्रात खेडोपाडी झाले होते.या प्रयोगांसाठी दादू इंदुरीकरांनी जेवढी वाहवा मिळायची तेवढीच शाबासकी प्रभा शिवणेकर यांना मिळाली. त्यांच्या या भूमिकेबद्दल त्या राष्ट्रपतिपदकाच्या मानकरी ठरल्या. प्रभाताई शिवणेकरांचे ’एका गंगेची कहाणी’ या नावाचे चरित्र प्रभाकर ओव्हाळ यांनी लिहिले आहे.गाढवाचं लग्न’या नाटकाचा मोलाचा वाटा हरिभाऊ वडगावकराचा(काशिकेदार)आहे. त्याची एक शेली होती ते जागेवर काव्य करायचे. त्यामुळे त्याला लोकांनी शिग्रकवी अशी पण ओळख होती. लवकर त्याच्या साहित्य वर P.HD होणार आहे. त्याच्या साहित्य वर लेखीनी काही विद्यार्थी वर्ग P.HD करून पास होत आहे. राष्ट्रपती पुरस्कार ने सन्मानित केले होते . वंशावळ असा प्रमाणे हरिभाऊ वडगावकर (ऊर्फ काशीकेदार )त्याचा मुलगा किसन हरिभाऊ काशीकेदार हयात नाही पण त्याचे नातू एकनाथ किसन काशीकेदार हे मुंबई मधे स्थायिक आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |