गाडेश्वर तलाव
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
मुंबई-पुण्याजवळ असलेल्या माथेरानच्या पॅनोरमा व सनसेट या लोकप्रिय पॉईंटस् वरून बाजूच्या खोल दरीत जो दिसतो तो, गाडेश्वर तलाव किंवा पनवेल तलाव.
माथेरानला जाण्यासाठी सर्वात सोयीची आणि नेहमी वापरली जाणारी वाट म्हणजे मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील नेरळ गावातून जाते ती. पण त्याच बरोबर काही कमी रूळलेल्या पण निसर्गप्रेमींसाठी आणि खास करून ट्रेकर्ससाठी पर्वणी असणाऱ्या वाटा चौक पॉईंट, सनसेट पॉईंट, मंकी पॉईंटसारख्या पॉईंटस् वरून माथेरान मध्ये येतात. यापैकी सनसेट, मंकी पॉईंटवरून चढणाऱ्या वाटेला लागण्याआधी वाघाची वाडी किंवा उधाणे या पायथ्याच्या गावी यावे लागते. पनवेलकडून या गावांकडे येणाऱ्या रस्त्यावर हा गाडेश्वर तलाव आहे. मुंबईहून पनवेलला जाताना, पनवेल एस्. टी. स्टॅंडच्या थोड्या अलिकडे डावीकडे एक रस्ता नेरे या गावाकडे वळतो. नेऱ्यापर्यंत ७ कि.मी. चांगला डांबरी रस्ता आहे. पुढे कच्चा रस्ता आहे. साधारण २ ते ३ कि. मी. वर ह्या रस्त्याला डावीकडे फुटणारा फाटा शांतिवन या कुष्ठरोग्यांनी केलेल्या नंदनवनाकडे घेऊन जातो. त्यासाठी गाढी नदी पार करावी लागते. मुद्दाम भेट देण्यासारखे हे ठिकाण आहे. डावीकडे न वळता सरळ पुढे गेल्यास हा रस्ता आपल्याला थेट गाडेश्वर तलावाकडे आणतो. नेऱ्यापासून अंतर अंदाजे ९ कि.मी. उन्हाळ्यात जीप किंवा मोटारसायकल इथवर येऊ शकते. पण पावसाळ्यात पायी येणेच उत्तम.