गाझियान्तेप (तुर्की: Gaziantep) हे तुर्कस्तान देशाच्या अनातोलिया भागातील एक प्रमुख शहर आहे. गाझियान्तेप प्रांताच्या राजधानीचे ठिकाण असलेले गाझियान्तेप तुर्कस्तानमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. गाझियान्तेप तुर्कस्तानच्या दक्षिण भागात तुर्कस्तान-सीरिया सीमेजवळ वसले असून ते अदनाच्या १८५ किमी पूर्वेस तर सीरियामधील अलेप्पोच्या ९७ किमी उत्तरेस स्थित आहे. २०१५ साली येथील लोकसंख्या सुमारे १५.५६ लाख होती.

गाझियान्तेप
Gaziantep
तुर्कस्तानमधील शहर


गाझियान्तेप is located in तुर्कस्तान
गाझियान्तेप
गाझियान्तेप
गाझियान्तेपचे तुर्कस्तानमधील स्थान

गुणक: 37°04′N 37°23′E / 37.067°N 37.383°E / 37.067; 37.383

देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
प्रांत गाझियान्तेप
प्रदेश आग्नेय अनातोलिया
समुद्रसपाटीपासुन उंची ३०० फूट (९१ मी)
लोकसंख्या  
  - शहर १५,५६,३८१
http://www.gaziantep-bld.gov.tr/

गाझियान्तेप जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे.

बाह्य दुवे

संपादन

  विकिव्हॉयेज वरील गाझियान्तेप पर्यटन गाईड (इंग्रजी)

संदर्भ

संपादन