गणपतीपुळे

रत्नागिरी जिल्ह्यातील श्री गणेश क्षेत्र
(गणपतिपुळे या पानावरून पुनर्निर्देशित)

गणपतीपुळे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी तालुक्यातील २७४.६४ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर रत्‍नागिरी २५ किलोमीटर अंतरावर आहे.

  ?गणपतीपुळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१७° ०८′ ४१.२८″ N, ७३° १५′ ५९.७६″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
२.७५ चौ. किमी
• २२.४३४ मी
जवळचे शहर रत्नागिरी
विभाग कोकण
जिल्हा रत्नागिरी
तालुका/के रत्नागिरी
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
१,२३६ (२०११)
• ४५०/किमी
८२५ /
भाषा मराठी

लोकसंख्या

संपादन

२०११ च्या जनगणनेनुसार गणपतीपुळे गावात ३०४ कुटुंबे असून, ६७७ पुरुष आणि ५५९ स्त्रिया मिळून गावाची एकूण लोकसंख्या १२३६ आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ४ आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६५५०७ [] आहे.

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

साक्षरता

संपादन
  • एकूण साक्षर लोकसंख्या: १०३६
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ५९१ (८७.३%)
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ४४५ (७९.६१%)

पिण्याचे पाणी

संपादन

गावात शुद्धीकरण केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात न झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे. तसेच गावामध्ये पिण्याच्या पाणीची सोय चांगली आहे. त्या प्रमाणे राहण्याची सोय ही चांगली आहे

स्वच्छता

संपादन

गावात उघडी गटारे आहेत. सांडपाणी थेट जलस्रोतांमध्ये सोडले जाते. या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे. गावात सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नाही. सर्वात जास्त स्वत्च्तेची काळजी येथे घेतली जाते.

पर्यटन

संपादन

गणपतीपुळे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची अतिशय गर्दी पहावयास मिळते. पर्यटक सुट्ट्या मधे पुळ्याच्या समुद्राला अवश्य भेट देतात.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.

गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.)चे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचे ठिकाण झाले आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देतात. चाफे - गणपतीपुळे ह्या मार्गाने जाताना गणपतीपुळे जवळच एक छोटेसे कातळशिल्प आहे. त्यात एक मनुष्याकृती आणि ३ प्राण्यांच्या आकृती आहेत.

चित्रदालन

संपादन

माहिती

संपादन

गणपतीपुळे हे मुंबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून जाताना निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की ३२ किमी अंतरावर गणपतीपुळे येते. तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्‍नागिरी शहरातूनही पर्यायी मार्ग आहे. गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय आल्लाद दायक आहे.

गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरून एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच भंडारपुळे हे सुंदर गाव आहे. भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळे सुरूचे बन व वाळूचा किनारा आहे. ह्या सर्व गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज आहे. इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे.

गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या गावाच्या इतिहासात असेही म्हणले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून पूजा केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच या सर्व रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे.

त्याच रस्त्याला लागून रत्‍नागिरीच्या दिशेने ’आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे. ’नवरा माझा नवसाचा’ आणि ’फुल थ्री धमाल’ ह्या चित्रपटांचे शूटिंग गणपतीपुळ्याला झाले होते. रत्‍नागिरी हे जवळचे रेल्वेस्थानक व शहर आहे.

रत्‍नागिरी आगारातून १०-१५ मिनिटांनी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत. गणपतीपुळे येथे मेणाच्या पुतळ्याचे एक संग्रहालय नव्यानेच चालू झाले आहे.

जमिनीचा वापर

संपादन

गणपतीपुळे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • बिगरशेती वापरात असलेली जमीन: २४.६४
  • ओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: ११९.५६
  • फुटकळ झाडीखालची जमीन: १४.९३
  • लागवडीयोग्य पडीक जमीन: २४.४३
  • कायमस्वरूपी पडीक जमीन: ५६.२५
  • सद्यस्थितीतील पडीक जमीन: १४.३२
  • पिकांखालची जमीन: २०.५१
  • एकूण बागायती जमीन: २०.५१

संदर्भ

संपादन