गंध (मराठी चित्रपट)

२००९ चा भारतीय चित्रपट
(गंध (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)


गंध हा सचिन कुंडलकर याने दिग्दर्शिलेला, इ.स. २००९ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.

गंध-एक सुगंध
दिग्दर्शन सचिन कुंडलकर
कथा अर्चना कुंडलकर आणि सचिन कुंडलकर
पटकथा सचिन कुंडलकर
प्रमुख कलाकार


संवाद सचिन कुंडलकर
भाषा मराठी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}

कथानक

संपादन


या चित्रपटात तीन कथा गुंफलेल्या आहेत :

  1. लग्नाच्या वयाची मुलगी
  2. औषध घेणारा माणूस
  3. गंध - सुगंध

तिन्ही कथा एकमेकांना गंध या एका धाग्यामधे बांधून ठेवतात. लग्नाच्या वयाची मुलगी ही पहिली कथा पुण्याच्या सदाशिव पेठेतल्या साधारण घरची जशीच्या तशी मांडलेली कहाणी आहे. या घरातली मुलगी ही मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातील व काळी-सावळी आहे. तिचे लग्न लवकर व्हावे ही तिच्या आईवडिलांची इच्छा आहे. पण दुर्दैवाने तसे घडत नाही. आईबाप खूप साधे, मुलगी लाडात वाढलेली आणि आई रोज देवाला नवस बोलणारी दाखवली आहे. मुलीला खूप स्थळे येतात आणि मुलीला पाहण्याचे रोजच प्रयोग होतात. ही मुलगी कला विद्यालयात कारकून आहे. तारुण्यसुलभ भावनांमुळे तिला नेहमी वाटते, की तिच्यावर कुणीतरी प्रेम करावे, ती कुणालातरी आवडावी. पण तिचे नशीब साथ देत नाही. महाविद्यालयातल्या तिच्या एक विनोदी मैत्रिणीजवळ ती नेहमी मनातल्या भावना बोलून दाखवते. पण त्या भावना मैत्रिणीला कळत नाहीत, म्हणून तिला बरेचदा मैत्रिणीचा रागही येतो. तिच्या कामाच्या जागी कला महाविद्यालयात शिकणारा मुलगा तिच्या जवळून गेला की एक मस्त मंद सुगंध दरवळतो. या सुगंधाने ही मुलगी व्याकुळ होत राहते. तिला तो सुगंध हवाहवासा वाटतो. जेव्हा तो सुगंध दरवळतो तेव्हा तिला चाहूल लागे की तो मुलगा जवळपास असावा. एके दिवशी त्या मुलाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ती त्याच्या मागेमागे जाते. तिला कळते, की त्या मुलाच्या घरची आर्थिक परिस्थिती फारच बेताची असते. तो दिवसा महविद्यालयात शिक्षण घेत असतो आणि रात्री एका उदबत्त्यांच्या कारखान्यात काम करत असतो. उदबत्त्यांचा सुगंध आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सुगंध असा मेळ या कथेतून साधला आहे.

कलाकार

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • "गंध (मराठी चित्रपट)".