प्रेमा माधव साखरदांडे या एक मराठी अभिनेत्री आहेत. हिज मास्टर्स व्हॉइस या ध्वनिमुद्रिका बनविणाऱ्या कंपनीत ध्वनिमुद्रक असलेल्या वसंतराव कामेरकर यांच्या त्या कन्या होत.

मुंबईच्या शारदा सदनमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या प्रेमा साखरदांडे यांनी शालेय रंगभूमी हे पुस्तक लिहिले आहे.

प्रेमा साखरदांडे यांना दहा भावंडे होती. त्यांच्या भगिनी ज्योत्स्ना कार्येकर, सुलभा देशपांडे आणि आशा दंडवते याही अभिनयक्षेत्रात होत्या. बंधू बापू, अशोक, विश्वनाथ, मुकुंद यांनीही रंगभूमी, चित्रपट, आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात काम केले आहे. भगिनी कुमुद या गायिका आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये गाण्याचे कार्यक्रम केले. अशोक कामेरकरांनी अमेरिकेत दुर्गा झाली गौरी या नाटकाचे प्रयोग केले.

साखरदांडे यांची मुलगी क्षमा साखरदांडे यांनी नाटकांत कामे केली आहेत.

नाटके संपादन

  • सखाराम बाइंडर (लक्ष्मी)

चित्रपट संपादन

  • दि इंपॉसिबल मर्डर
  • बेट
  • स्पेशल २६