ज्योत्स्ना कार्येकर

ज्योत्स्ना कार्येकर (इ.स. १९३४ - ३१ डिसेंबर, इ.स. २०१६:मुंबई, महाराष्ट्र) या मराठी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवर तसेच जाहिरात, मालिका व सिनेक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एक मराठी अभिनेत्री होत्या. त्यांचे माहेरचे आडनाव कामेरकर होते.

ज्योत्स्ना कार्येकर या एचएमव्ही या ध्वनिमुद्रिका बनविणाऱ्या कंपनीतील ध्वनिमुद्रक वसंतराव कामेरकर यांच्या कन्या होत्या. सुलभा देशपांडे, प्रेमा साखरदांडे आणि आशा दंडवते या ज्योत्स्ना कार्येकर यांच्या बहीणी होत. कामेरकरांच्या घरी गायकांच्या मैफली आणि नाटकाच्या तालमी व्हायच्या. याचा प्रभाव सगळ्या बहीणींवर पडला. कार्येकरांना अभिनेता यतीन कार्येकर तसेच प्रफुल्ल व चेतन अशी तीन मुले होती.

अभिनय संपादन

नाटके संपादन

  • आधेअधुरे
  • काचेचा चंद्र
  • गिधाडे
  • गौराई
  • माणूस नावाचे बेट

चित्रपट संपादन

  • कथा
  • कहानी घर घर की (हिंदी)
  • राख
  • जोश (हिंदी)
  • सत्त्या

दूरचित्रवाणी मालिका संपादन

  • कहानी घर घर की (या हिंदी मालिकेत त्यांनी साकारलेली नानी ही भूमिका अतिशय गाजली).
  • राजा की आयेगी बारात (हिंदी)
  • शांती (हिंदी)
  • साथ निभाना साथिया (हिंदी)

साचा:DEFAULTOSRT:कार्येकर, ज्योत्स्ना