खरगपूर

पश्चिम बंगाल मधील एक औद्योगिक शहर.
(खडगपूर या पानावरून पुनर्निर्देशित)


खरगपूर तथा खडगपूर हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील एक औद्योगिक आहे. खडगपूर बंगालच्या दक्षिण भागात कोलकातापासून ११६ किमी अंतरावर आहे. हावडा-चेन्नईहावडा-मुंबई ह्या भारतामधील दोन प्रमुख रेल्वेमार्गांवर असलेले खडगपूर रेल्वे स्थानक देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.

खडगपूर
খড়গপুর
पश्चिम बंगालमधील शहर
खडगपूर is located in पश्चिम बंगाल
खडगपूर
खडगपूर
खडगपूरचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 22°19′49″N 87°19′25″E / 22.33028°N 87.32361°E / 22.33028; 87.32361

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा पश्चिम मिदनापूर जिल्हा
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २,०७,६०४
  - महानगर २,९९,६८३
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०

भारत सरकारने १९५० साली स्थापन केलेल्या प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्था ह्या शैक्षणिक संस्थां(आयआयटी)पैकी एक असलेली भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूर देशातील एक दर्जेदार तांत्रिक शिक्षणकेंद्र मानली जाते.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत