क्वीचौ (देवनागरी लेखनभेद: ग्वीचौ ; सोपी चिनी लिपी: 贵州; पारंपरिक चिनी लिपी: 貴州; फीनयिन: Gùizhōu; ) हा चीन देशाच्या नैऋत्येकडील प्रांत आहे. क्वीयांग येथे क्वीचौची राजधानी आहे.

क्वीचौ
貴州省
चीनचा प्रांत

क्वीचौचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
क्वीचौचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी क्वीयांग
क्षेत्रफळ १,७६,१६७ चौ. किमी (६८,०१८ चौ. मैल)
लोकसंख्या ३,४७,३६,४६८
घनता २०० /चौ. किमी (५२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-GZ
संकेतस्थळ http://www.gzgov.gov.cn/

भूगोल

संपादन

क्वीचौच्या उत्तरेस सिच्वान प्रांत व चोंगछिंग महानगर क्षेत्र असून, पूर्वेस हूनान, दक्षिणेस क्वांग्शी, तर पश्चिमेस युइन्नान हे प्रांत आहेत. क्वीचौचा पश्चिमेकडील मुलूख डोंगराळ असून तो युइन्नान-क्वीचौच्या पठाराचा भाग आहे. प्रांताचा पूर्वेकडील व दक्षिणेकडील मुलूख काही अंशी सखल आहे.

क्वीचौचे हवामान दमट उपोष्णकटिबंधीय प्रकारात मोडणारे आहे. येथील वार्षिक सरासरी तापमान १०° - २०° सेल्सियस असून, जानेवारीत पारा १° ते १०° सेल्सियसांदरम्यान राहतो, तर जून महिन्यात पारा १७° ते २८° सेल्सियसांदरम्यान राहतो.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत