कौंडिण्यपूर हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील अमरावती जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावी, श्रीकृष्णपत्नी रुक्मिणीचे माहेर होते.

येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते.तेथून एक दिंडी आषाढी एकादशीस पंढरपूरला जाते. त्या दिंडीची परंपरा ४००हून अधिक वर्षे जुनी आहे.[]

कौंडिण्यपूरच्या मंदिरातील मूर्ती

हे ठिकाण विदर्भनंदन राज्याची राजधानीचे शहर होते. रामाची आजी, अज राजाची पत्नी इंदुमती (राजा दशरथाची आई), अगस्तीची पत्नी लोपामुद्रा तसेच भगीरथमाता सुकेशिनी या सर्वांचे माहेर 'कौंडिण्यपूर' हे होते. नलदमयंतीचा विवाह हा येथेच झाला. येथील अंबिका मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले, अशी आख्यायिका आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ तरुण भारत,नागपूर ई-पेपर दि. १८/०७/२०१३ दि.१८/०७/२०१३ रोजी दुपारी १७.१३ वाजता जसे दिसले तसे.
  2. ^ लोकमत,नागपूर-ई-पेपर-दि.०२/१०/२०१३,पान क्र.१ व ९ Archived 2013-10-23 at the Wayback Machine. दि.०२/१०/२०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता जसे दिसले तसे.