कोतवाल (पक्षी)
शास्त्रीय नाव | डायक्रुरस माक्रोसर्कस (Vieillot) |
---|---|
कुळ | कोष्ठपालाद्य (डायक्रुरिडी) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | Black Drongo |
संस्कृत | कोष्ठप |
हिंदी | कोतवाल |
वर्णन
संपादनकोतवाल पक्षी हा साधारण ३१ सें. मी. आकाराचा संपूर्ण काळ्या रंगाचा, सडपातळ, चपळ पक्षी आहे. लांब, दुंभंगलेली शेपूट हे याचे वैशिष्ट्य. कोतवाल नर-मादी दिसायला सारखेच असतात.
हे पक्षी संरक्षणार्थ कावळे, ससाणे सारख्या मोठ्या, हिंस्र पक्ष्यांच्या मागे लागून त्यांना पळवून लावतात म्हणून यांच्या आश्रयाने इतर लहान-मोठे पक्षी आपले घरटे बांधतात. या कामावरून यांचे नाव कोतवाल पडले असावे.
आवाज
संपादनवास्तव्य/आढळस्थान
संपादनकोतवाल (पक्षी) संपूर्ण भारतभर आढळतो तसेच ईराणसह, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, चीन, इंडोनेशिया या देशांमध्येही याचे वास्तव्य आहे.
हे पक्षी एकट्याने किंवा लहान-मोठ्या थव्याने शेतीच्या भागात आणि मोकळ्या मैदानी प्रदेशात राहणे पसंत करतात. हे सहसा विद्युत तारांवर किंवा गुरांच्या कळपात राहून विविध कीट पकडून खातात.
खाद्य
संपादनकोतवाल (पक्षी) मुख्यत्वे कीटभक्षी आहे. कीटक, फुलातील मध आणि क्वचीत लहान पक्षी हे या पक्ष्यांचे खाद्य आहे तसेच इतर पक्ष्यांनी आणलेले खाद्य हिसकावून खाण्यातही हे तरबेज असतात.
प्रजनन काळ
संपादनएप्रिल ते ऑगस्ट हा काळ कोतवाल पक्ष्यांचा वीणीचा काळ असून यांचे घरटे जमिनीपासून ५ ते १० मी. उंच झाडांवर खोलगट, काटक्यांनी आणि कोळ्याच्या जाळ्यांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ३ ते ५ पांढऱ्या रंगाची त्यावर भुरकट-तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगेरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
चित्रदालन
संपादन-
कोतवाल
-
कोतवाल
-
कोतवाल
-
कोतवाल पिल्ले आणि घरटे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |