कोंबडी वडा

(कोंबडीवडा या पानावरून पुनर्निर्देशित)

तांदूळ आणि मिश्र डाळीपासून बनवलेले हे वडे कोकणाची जान आहे. कोंबडीची सागुती/रस्सा आणि हे वडे ही कॉम्बो डीश "कोंबडी वडे " म्हणून प्रसिद्ध आहे.हे वडे संपूर्ण कोकणात बनवले जातात पण हे "मालवणी वडे " म्हणून पण ओळखले जातात. हे वडे कोंबडीचा रस्सा, मटणाचा रस्सा किंव्हा काळ्या वाटण्याचा रस्सा यासोबत खाल्ले जातात. कोंबडी वडे बनवण्याचे साहित्य व कृती :

साहित्य

संपादन

तांदूळ स्वच्छ धुवा. निथळून सुती कापडावर पसरऊन वाळउन घ्या. डाळी व इतर पदार्थ धुउन घ्यायची गरज नाही. तांदूळ धुतल्यामुळे वडे मऊ होतात. पण पावसामुळे किंव्हा घाई असेल तर तांदूळ नाही धुतले तरी चालतील. वरील सर्व पदार्थ एकत्र करून गिरणीतून भरड दळून आणावे. पीठ हवाबंद डब्यात ठेवावे. खरतरं जेंव्हा वडे करायचे असतील तेंव्हाच पीठ दळून आणावे. ताज्या पिठाचेच वाडे चांगले लागतात.

  • सर्व पीठ आणि धने पूड वै. सर्व बाजारात उपलब्ध असतात. ते सर्व एकत्र करून वापरता येइल.
  • २ कप तांदळाचे पीठ, अर्धा कप बेसन आणि ६ उडदाचे पापड भिजऊन कुस्करून पीठ भिजवता येईल.
  • उडदाची डाळ, मेथी दाणे, बडीशेप हे किमान २ तास भिजवायचे आणि खाली दिलेल्या मासाल्यासोबत वाटून तांदळाचे पीठ, बेसन यात एकत्र करून पीठ मळता येईल.

मुख्य भाग

  • कांदा, मिरची, आल, लसूण, मिरची हे सगळ वाटून घ्या. (काही लोकं आल- मिरची वै. वापरत नाहीत पण कांदा जरूर घालावा. )
  • एका परातीत पीठ, हळद, मीठ आणि गरम पाणी टाकून चपातीच्या कणकेप्रमाणे घट्ट मळून घ्या.
  • रात्रभर उबदार जागेत झाकून ठेवा.
  • सकाळी पीठ फुगून येईल. छान मऊ झालेलं असेल.
  • एक भिजलेला सुती कपड्याचा तुकडा पोळपाटावर पसरून लिंबाएवढ्या आकाराचे पीठाचे गोळे करून वडे थापून घ्या. तेल गरम करून मध्यम आचेवर वडे व्यवस्थित तळून घ्या. वडे छान फुगतात.

संदर्भ

संपादन