कै.ग.रा. पुरोहित कन्या प्रशाला (सांगली)

कै.ग.रा. पुरोहित कन्या प्रशाला ( कैलासवासी गजाजन रामचंद्र पुरोहित कन्या प्रशाला) ही शाळा राजवाडा, सांगली येथे आहे. ही शाळा सांगली शिक्षण संस्था या संस्थेची आहे.[१] या संस्थेचे ब्रीद वाक्य 'ॐ तेजस्वि नावधीतमस्तु' असे आहे. या शाळेची स्थापना इ.स. १९७१ साली झाली. या शाळेमध्ये ५ वी ते १० वीचे वर्ग भरवले जातात. शाळेची एकूण मुलींची संख्या १६०० आहे. शाळेत मराठी आणि सेमी माध्यमामधून अध्यापन केले जाते.[२]

उपलब्ध सुविधा संपादन

शालेय परिसर संपादन

शाळेचे आवार एक ते दीड एकर आहे. नारळ, पिंपळ, जास्वंद, आवळा अशी अनेक झाडे आहेत. छोटी बाग व क्रीडामैदान आहे. शाळा तीन मजली असून एकूण २४ वर्ग आहेत. एका वर्गाचा पट ७५ ते ८० इतका आहे.

शालेय सांस्कृतिक कार्यक्रम संपादन

प्रशालेमध्ये स्नेहसंमेलन,मराठी दिन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.हातगा हा खेळ खेळला जातो.स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन,शिक्षक दिन,महात्मा गांधी जयंती,विज्ञान दिन इत्यादींचे आयोजन प्रशालेतर्फे होते.

शालेय क्रीडा विभाग संपादन

प्रशालेत कबड्डी,व्हॉलीबॉल,खोखो,लांब उडी,उंच उडी,गोळा फेक,थाळी फेक,योगासने या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.

उपक्रम संपादन

  1. ^ "स्वागतकक्ष | कै. ग. रा. पुरोहित कन्याप्रशाला, सांगली". www.sss.ac.in. Archived from the original on 2018-01-05. 2018-03-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Purohit Kanya Prashala, Sangli". www.purohitkanyaprashala.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-03-12. 2018-03-30 रोजी पाहिले.