केरळ राज्याची भौगोलिक वैशिष्ट्ये

केरळ राज्य हे अरबी समुद्रामधील लक्षद्वीप बेटे व पूर्वेला सह्याद्रीच्या उभ्या रांगेदरम्यानच्या पट्यात येते. राज्याचा पसारा ०८° १८' ते १२° ४८' अक्षांश व ७४° ५२' ते ७२° २२', रेखांश या दरम्यान आहे. केरळ मध्ये वर्षभर विषुववृत्तीय दमट हवामान असते. राज्याला ५९० कि.मी. (३६७ मैल) किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

पश्चिम घाटाच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात पूर्व केरळचे उंच पर्वत, खोल द-या आहेत.पश्चिमेकडे वाहणा-या ४१ नद्या आणि पूर्वेकडे वाहणा-या ३ नद्या या प्रदेशातूंच उगम पावतात. पल्लकड येथे पश्चिम घातामुळे एक डोंगरांची भिंत तयार झाली आहे जेथून भारताच्या अन्य देशात जायला मार्ग आहे. मी.उंचीवर असलेले अन्नामुडी हे येथील सर्वोच्च शिखर आहे.

केरळची पश्चिम किनारपट्टी ही तुलनेने सपाट आहे. तसेच तेथील तलाव, परस्पर छेदणारे घळी , नद्या यांना Kerala Backwaterअशी संज्ञा आहे. वेंबनाड तलाव हा यामध्ये सर्वात प्रमुख असून अलपुझा आणि कोची यांच्या दरम्यान ते आहे.वेंबनाड तलावाचा जलसाठा हा केरळात सर्वात अधिक असून अलपुझा आणि कोची याच्या दरम्यान २०० कि.मी. पेक्षा अधिक भाग याने व्यापला आहे.केरळच्या महत्त्वाच्या ४४ नद्यांमध्ये पेरियार (२४४कि.मी.), भरत पुझा ( २०९ कि.मी ), पाम्बा ( १७६ कि.मी.) चालीयार (१६९ कि.मी) कडलू दिपुझा ( १३० कि.मी) वलपत्तनम (१२९ कि.मी) अचन कोवली (१२८ कि.मी ) यांचा समावेश होतो.केरळातील नद्यांची सरासरी लांबी ६४ कि.मी आहे. बहुतांशी नद्या या लहान असून त्या पावसाच्या पाण्यामुळेच प्रवाही होतात..केरळातील नद्यांचा आकार लहान असल्याने आणि त्यांचे त्रिभुज प्रदेशही लहान असल्याने पर्यावरणीय प्रश्न उपस्थित होतात.वाळू उपसा आणि प्रदूषण यांच्या समस्या या नद्यांना भेडसावतात. या राज्याला त्यामुळे भूस्स्खलन , पूर यासाख्या नैसर्गिक आपत्तीना सामोरे जावे लागते.२००४ च्या सुनामी वादळाचा तडाखा या राज्याला सहन करावा लागला.