वेंबनाड
वेंबनाड हे भारतामधील सर्वाधिक लांबीचे सरोवर आहे. केरळ राज्याच्या दक्षिण भागात अरबी समुद्राला समांतर असलेले वेंबनाड सरोवर केरळच्या पर्यटनाचे मोठे आकर्षण मानले जाते. कोचीच्या दक्षिणेस स्थित असलेले हे सरोवर अलप्पुळा शहरापर्यंत पसरले आहे व एर्नाकुलम जिल्हा, अलप्पुळा जिल्हा व कोट्टायम जिल्ह्यांच्या अखत्यारीत येते. नेहरू ट्रॉफी बोट रेस वेंबनाड तलावात आयोजित केली जाते.
वेंबनाड स | |
---|---|
स्थान | केरळ |
गुणक: 9°35′N 76°25′E / 9.583°N 76.417°Eगुणक: 9°35′N 76°25′E / 9.583°N 76.417°E | |
प्रमुख अंतर्वाह | अनेक नद्या |
प्रमुख बहिर्वाह | अनेक कालवे |
भोवतालचे देश | भारत |
कमाल लांबी | ९६.५ किमी (६०.० मैल) |
कमाल रुंदी | १४ किमी (८.७ मैल) |
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ | २,०३३ चौ. किमी (७८५ चौ. मैल) |
कमाल खोली | १२ मी (३९ फूट) |
उंची | ० मी (० फूट) |