कॅल्विन कूलिज

जॉन कॅल्विन कूलिज, कनिष्ठ (इंग्लिश: John Calvin Coolidge, Jr., जॉन कॅल्विन कूलिज, ज्यूनियर) (४ जुलै, इ.स. १८७२ - ५ जानेवारी, इ.स. १९३३) हा अमेरिकेचा ३०वा राष्ट्राध्यक्ष होते. याने २ ऑगस्ट, इ.स. १९२३ ते ४ मार्च, इ.स. १९२९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.

पेशाने वकील असलेला कूलिज रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होता. राजकारणात तळापासून सुरुवात करून तो मॅसेच्युसेट्स संस्थानाच्या गव्हर्नरपदापर्यंत पोचला. इ.स. १९२० साली वॉरेन हार्डिंग याच्या अध्यक्षीय राजवटीत तो अमेरिकेचा २९वा उपराष्ट्राध्यक्ष होता. ऑगस्ट, इ.स. १९२३मध्ये वॉरेन हार्डिंग याचा अनपेक्षित मृत्यू झाल्यामुळे तत्पश्चात त्याने अध्यक्षपदाची धुरा वाहिली. इ.स. १९२४ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये कूलिज स्वतः उभा राहिला व निवडून आला.

बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.