कालाब्रिया
(कॅलाब्रिया या पानावरून पुनर्निर्देशित)
कालाब्रिया (इटालियन: Calabria) हा इटलीच्या दक्षिण भागातील एक प्रदेश आहे. इटालियन द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर वसलेल्या कालाब्रियाच्या पूर्वेस आयोनियन समुद्र, पश्चिमेला तिऱ्हेनियन समुद्र, नैऋत्येला मेसिनाच्या सामुद्रधुनीपलीकडे सिसिली तर उत्तरेला बाझिलिकाता प्रदेश आहेत. ऐतिहासिक काळात नेपल्स व दोन सिसिलींच्या राजतंत्रांचा भाग असलेल्या कालाब्रियाचा ४२ टक्के भाग डोंगराळ आहे. कातान्झारो ही कालाब्रियाची राजधानी तर रेद्जो कालाब्रिया हे येथील सर्वात मोठे शहर आहे.
कालाब्रिया Calabria | |||
इटलीचा प्रदेश | |||
| |||
कालाब्रियाचे इटली देशामधील स्थान | |||
देश | इटली | ||
राजधानी | कातान्झारो | ||
क्षेत्रफळ | १५,०८१ चौ. किमी (५,८२३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २०,०९,२२७ | ||
घनता | १३३.२ /चौ. किमी (३४५ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | IT-78 | ||
संकेतस्थळ | http://www.regione.calabria.it |
कृषी व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग असून येथील ७० टक्के झाडे ऑलिव्हची आहेत.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 1998-01-22 at the Wayback Machine.
- पर्यटन Archived 2011-10-06 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील कालाब्रिया पर्यटन गाईड (इंग्रजी)