कॅरोल डब्ल्यू. ग्राइडर

कॅरोल विडनी ग्राइडर (१५ एप्रिल, १९६१:सान डियेगो, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) या अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आहेत. या कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांताक्रुझ येथे प्राध्यापक आहेत.

यांना एलिझाबेथ ब्लॅकबर्न आणि जॅक डब्ल्यू. झोस्टाक यांच्याबरोबर २००९ चे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दिले गेले होते.