कॅम्डेन हे अमेरिका देशातील न्यू जर्सी राज्यामधील एक शहर आहे. हे शहर न्यू जर्सीच्या दक्षिण भागात डेलावेर नदीच्या किनाऱ्यावर वसले असून ते फिलाडेल्फिया महानगराचा भाग मानले जाते. एकेकाळी अमेरिकेमधील मोठे औद्योगिक केंद्र असलेले कॅम्डेन सध्या येथील हिंसाचार, अशांती व भ्रष्टाचारासाठी कुप्रसिद्ध बनले आहे. २०१२ साली अमेरिकेमधील सर्वात धोकादायक शहर हा वाईट खिताब कॅम्डेनला मिळाला होता.

कॅम्डेन
Camden
अमेरिकामधील शहर

कॅम्डेन नगर भवन
कॅम्डेन is located in न्यू जर्सी
कॅम्डेन
कॅम्डेन
कॅम्डेनचे न्यू जर्सीमधील स्थान
कॅम्डेन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कॅम्डेन
कॅम्डेन
कॅम्डेनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°56′13″N 75°6′24″W / 39.93694°N 75.10667°W / 39.93694; -75.10667

देश Flag of the United States अमेरिका
राज्य न्यू जर्सी
स्थापना वर्ष १३ नोव्हेंबर, इ.स. १७९२
क्षेत्रफळ २६.७८ चौ. किमी (१०.३४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६ फूट (४.९ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ७७,३४४
  - घनता ३,३४७ /चौ. किमी (८,६७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०५:००
ci.camden.nj.us

२०१० साली कॅम्डेन शहराची लोकसंख्या सुमारे ७७,००० होती. रटगर्स विद्यापीठाच्या तीन प्रमुख कॅम्पसपैकी एक कॅम्डेनमध्ये स्थित आहे.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत