कॅथी बेट्स
कॅथलीन डॉइल बेट्स (२८ जून १९४८)[१] ही अमेरिकन चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहे. आपल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळाच्या कारकीर्दीत तिला ऑस्कर पुरस्कार, दोन एमी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि दोन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळालेले आहेत. तिला टोनी पुरस्कार आणि दोन बाफ्टा पुरस्कारांसाठी नामांकन देखील मिळाले आहे.
मेम्फिस, टेनेसी येथे जन्मलेल्या, तिने अभिनय कारकीर्द करण्यासाठी न्यू यॉर्क शहरात जाण्यापूर्वी दक्षिण मेथोडिस्ट विद्यापीठात नाटकाचा अभ्यास केला. टेक ऑफ (१९७१) मधील तिच्या पहिल्या ऑन-स्क्रीन भूमिकेत निवड होण्यापूर्वी तिने किरकोळ रंगमंचावर भूमिका केल्या होत्या. तिची पहिली ऑफ-ब्रॉडवे स्टेज भूमिका व्हॅनिटीज (१९७६) नाटकात होती. १९७० आणि १९८० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात तिने पडद्यावर आणि रंगमंचावर काम करणे सुरूच ठेवले आणि नाईट, मदर (१९८३) या नाटकातील सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीसाठी टोनी पुरस्काराचे नामांकन मिळवले.[२] फ्रँकी अँड जॉनी इन द क्लेअर डी ल्युन (१९८८) नाटकामधील तिच्या भूमिकेसाठी तिला ओबी पुरस्कार मिळाला.[३]
थ्रिलर मिझरी (१९९०) मधील ॲनी विल्क्सच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळाला.[४] हा चित्रपट स्टीफन किंगच्या कादंबरीवर आधारीत होता ज्यात तिने ॲनी विल्क्सचे पात्र साकारले होते. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट ने त्यांच्या "१०० हिरो आणि व्हिलन" यादीत ॲनी विल्क्सचा समावेश केला, तिला १७ व्या क्रमांकाच्या प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून स्थान दिले आणि सहाव्या क्रमांकाचा खलनायक म्हणुन नोंद मिळाली.[५] प्राइमरी कलर्स (१९९८), अबाउट श्मिट (२००२) आणि रिचर्ड ज्वेल (२०१९) मध्ये तिच्या इतर ऑस्कर-नामांकित भूमिका होत्या ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. फ्राइड ग्रीन टोमॅटोज (१९९१), डोलोरेस क्लेबोर्न (१९९५), टायटॅनिक (१९९७), द वॉटरबॉय (१९९८), रिव्होल्युशनरी रोड (२००८), द ब्लाइंड साइड (२००९), आणि मिडनाईट इन पॅरिस (२०११) या तिच्या इतर उल्लेखनीय चित्रपटांचा समावेश आहे.
बेट्स टेलिव्हिजनवरील तिच्या व्यापक कामासाठी देखील ओळखली जाते. तिने टू अँड अ हाफ मेन (२०१२) च्या नवव्या सत्रासाठी कॉमेडी मालिकेतील उत्कृष्ट अतिथी अभिनेत्रीचा पहिला एमी पुरस्कार जिंकला[६] आणि अमेरिकन हॉरर स्टोरी: कोव्हेन (२०१३) मधील डेल्फीन ला लॉरीच्या भूमिकेसाठी (न्यू ऑर्लिन्सची एक सीरियल किलर) लघु मालिका किंवा चित्रपटातील उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी तिचा दुसरा एमी पुरस्कार जिंकला.[७] द लेट शिफ्ट (१९९६), ॲनी (१९९९), सिक्स फीट अंडर (२००३), वॉर्म स्प्रिंग्स (२००५), हॅरीज लॉ (२०११-२०१२), अमेरिकन हॉरर स्टोरी: फ्रीक शो (२०१४) आणि अमेरिकन हॉरर स्टोरी: हॉटेल (२०१५) या सर्वांमध्ये तिच्या इतर एमी-नामांकित भूमिका होत्या.
तिने डॅश अँड लिली (१९९९), फार्गो (२००३) आणि ॲम्ब्युलन्स गर्ल (२००५) हे चित्रपट दिग्दर्शीत केले आहे.[८]
वैयक्तिक जीवन
संपादनबेट्सचा जन्म मेम्फिस, टेनेसी येथे झाला. ती यांत्रिक अभियंता लँगडॉन डॉयल बेट्स आणि गृहिणी बर्टी कॅथलीन यांच्या तीन मुलींपैकी सर्वात लहान होती. तिचे पणजोबा, न्यू ऑर्लीन्स, लुईझियाना येथे स्थलांतरित असलेले आयरिश होते जे अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॅक्सन यांचे डॉक्टर म्हणून काम करत होते.[९] तिने व्हाईट स्टेशन हायस्कूल (१९६५) आणि सदर्न मेथोडिस्ट युनिव्हर्सिटी (१९६९) मधून लवकर पदवी प्राप्त केली, जिथे तिने थिएटरचा अभ्यास केला आणि अल्फा डेल्टा पाय सॉरिटीची सदस्य बनली.[१०] अभिनय कारकीर्द करण्यासाठी ती १९७० मध्ये न्यू यॉर्क शहरात गेली.[११] बेट्स हे विल्यम एस्पर स्टुडिओच्या परफॉर्मिंग आर्ट्सचे माजी विद्यार्थीनी आहे.[१२]
किशोरवयात, बेट्सने स्वतः ची वर्णन केलेली "दुःखी गाणी" लिहिली आणि नैराश्याचा सामना केला.[१३] १९९१ ते १९९७ मध्ये घटस्फोट होईपर्यंत बेट्सचे टोनी कॅम्पिसीशी सहा वर्षे लग्न झाले होते. ती १९७७ मध्ये कॅम्पिसीला भेटली आणि लग्नाआधी १४ वर्षे त्यांचे संबंध होते.[१४][३][१५] ती युनायटेड मेथोडिस्ट चर्चची सदस्य आणि नोंदणीकृत डेमोक्रॅट आहे.[१६]
२००३ मध्ये निदान झाल्यापासून बेट्सने गर्भाशयाच्या कर्करोगाशी लढा दिला आहे.[१६] सप्टेंबर २०१२ मध्ये, तिने ट्विटर द्वारे उघड केले की तिला दोन महिन्यांपूर्वी स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते आणि दुहेरी स्तनदाहाची शस्त्रक्रिया झाली होती.[१७][१८] २०१४ मध्ये, न्यू यॉर्क वॉक फॉर लिम्फेडेमा आणि लिम्फॅटिक डिसीजेसमध्ये, बेट्सने पूर्व-रेकॉर्ड केलेल्या ऑडिओद्वारे घोषित केले की, दुहेरी मास्टेक्टॉमीमुळे, तिला दोन्ही हातांमध्ये लिम्फेडेमा आहे. त्या वर्षी, बेट्स लिम्फेडेमाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि लिम्फॅटिक एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्कच्या मानद मंडळाचे अध्यक्ष बनले.[१९][२०]
११ मे २०१८ रोजी, बेट्सने पुढील संशोधन निधीसाठी काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी कॅपिटल हिल लॉबी डेमध्ये नेतृत्व केले. दुसऱ्या दिवशी, १२ मे २०१८ रोजी लिंकन मेमोरियल येथे बेट्सने पहिल्या-वहिल्या लिम्फेडेमाच्या चळवळीच्या समर्थकांना संबोधित केले. या दीर्घकालीन लिम्फॅटिक रोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या भूमिकेसाठी तिला २०१८ WebMD हेल्थ हीरोज "गेम चेंजर" पुरस्कार प्रदान करण्यात आला.[२१]
संदर्भ
संपादन- ^ "Kathy Bates - Biography". May 26, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 26, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Kathy Bates". National Women's History Museum. May 26, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 26, 2019 रोजी पाहिले.
- ^ a b Sacks, David (January 27, 1991). "I Never Was an Ingenue". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. January 3, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 26, 2019 रोजी पाहिले.
- ^ Beachum, Robert Pius, Chris; Pius, Robert; Beachum, Chris (September 12, 2018). "Kathy Bates movies: 15 greatest films, ranked worst to best, include 'Misery,' 'Dolores Claiborne,' 'Primary Colors'". GoldDerby (इंग्रजी भाषेत). May 26, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 26, 2019 रोजी पाहिले.
- ^ "AFI's 100 Years...100 Heroes & Villains". www.afi.com. March 4, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 27, 2019 रोजी पाहिले.
- ^ Berkshire, Geoff (August 20, 2015). "Kathy Bates Remembers Winning Her First Emmy". Variety (इंग्रजी भाषेत). June 8, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 27, 2019 रोजी पाहिले.
- ^ Chi, Paul (November 22, 2016). "How American Horror Story Got Kathy Bates Her Groove Back". HWD (इंग्रजी भाषेत). November 24, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 27, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Kathy Bates". Television Academy. February 19, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 26, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Public Interview with Kathy Bates". ScottsMovies.com. Scott's Movie Comments. August 21, 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 12, 2015 रोजी पाहिले.
- ^ "University of Washington Panhellenic Association – Alpha Delta Pi". May 7, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 12, 2015 रोजी पाहिले.
- ^ "Kathy Bates Biography". August 3, 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 12, 2015 रोजी पाहिले.
- ^ "William Esper: Notable Alumni". esperstudio.com. 2020. June 1, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 7, 2020 रोजी पाहिले.
- ^ Sacks, David (January 27, 1991). "I Never Was an Ingenue". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. January 3, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 27, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Married Oscar Winners Who Didn't Give Thanks and Later Split". The Hollywood Reporter. February 26, 2016. August 10, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 10, 2017 रोजी पाहिले.
- ^ "Kathy Bates". Turner Classic Movies. May 14, 2023 रोजी पाहिले.
- ^ a b An Interview With Kathy Bates, Skip E. Lowe, १९९१
- ^ "Kathy Bates reveals she is battling breast cancer". September 14, 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 13, 2012 रोजी पाहिले.
- ^ Celizic, Mike (January 9, 2009). "Kathy Bates reveals her triumph over ovarian cancer". MSN. March 2, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 17, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Lymphatic Education and Research Network, Lymphedema Lymphatic Disease – Lymphatic Education & Research Network". lymphaticnetwork.org. March 22, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 23, 2019 रोजी पाहिले.
- ^ "Honorary Board – Lymphatic Education & Research Network". lymphaticnetwork.org. March 24, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. March 23, 2019 रोजी पाहिले.
- ^ "WebMD Recognizes Seven Cancer Innovators With Its Health Heroes Award – The ASCO Post". www.ascopost.com. August 2, 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 10, 2019 रोजी पाहिले.