कूच बिहार
कूच बिहार (बंगाली: কোচবিহার) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कूच बिहार जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बंगालच्या उत्तर भागात हिमालयच्या पायथ्याशी वसलेले कूच बिहार शहर स्वातंत्र्यापूर्वी कूच बिहार संस्थानचे मुख्यालय होते. येथील कूच बिहार राजवाडा आजच्या घडीला एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.
कूच बिहार কোচবিহার |
|
पश्चिम बंगालमधील शहर | |
कूच बिहार राजवाडा |
|
देश | भारत |
राज्य | पश्चिम बंगाल |
जिल्हा | कूच बिहार जिल्हा |
क्षेत्रफळ | ८.२९ चौ. किमी (३.२० चौ. मैल) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ७७,९३५ |
- महानगर | १,०६,८४३ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
न्यू कूच बिहार रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या न्यू जलपाईगुडी-गुवाहाटी रेल्वेमार्गावर असून येथे सर्व प्रमुख गाड्यांचा थांबा आहे. कूच बिहार विमानतळ आजच्या घडीला वापरात नाही.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत