कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्ली सल्तनतीतील पहिला शासक होता. भारतावर इस्लामी राजवटीची सुरुवात याच्यानंतर झाली. याला मोहम्मद घौरीने दिल्लीचा शासक म्हणून नेमले. कुतुबुद्दीन हा मूळचा तुर्कस्तानातील होता व लहानपणीच विकला गेल्याने तो गुलाम होता. म्हणून याच्या वंशाला गुलाम घराणे असे म्हणतात. दिल्ली मधील कुतुबमिनारचे बांधकाम याच्या शासनकाळात चालू झाले त्यामुळे त्याचे नाव त्याच्यावरुन कुतुबमिनार असे पडले आहे जे दिल्लीचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे. त्याचा प्रामाणिकपणा, यु्द्धचातुर्य यांमुळे घोरीच्या सरदारामध्ये तो श्रेष्ठ ठरला.