किल बिल भाग २ हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. क्वेंटिन टारान्टिनोचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये उमा थर्मन नायिकेच्या भूमिकेमध्ये आहे. ह्या चित्रपटाचे कथानक लांब बनल्यामुळे तो २ भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. किल बिलचा पहिला भाग किल बिल भाग १ २००३ साली प्रदर्शित केला गेला होता.

किल बिल भाग १
दिग्दर्शन क्वेंटिन टारान्टिनो
निर्मिती लॉरेन्स बेंडर
कथा क्वेंटिन टारान्टिनो
प्रमुख कलाकार उमा थर्मन
डेव्हिड कॅराडीन
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १६ एप्रिल २००४
अवधी १३६ मिनिटे

किल बिलचे कथानक सूड ह्या विषयावर आधारित असून वधूच्या वेषामध्ये उमा थर्मन लग्नाच्या तयारीमध्ये असताना तिच्या भूतपूर्व गॅंगमधील माजी सहकारी व त्यांचा म्होरक्या बिल तिला गोळ्या घालतात. ह्या हल्ल्यामधून ती बचावते व सूडाने पेटून बिल व इतर सर्व सहकाऱ्यांसोबत बदला घेते. ह्या चित्रपटाचे पुष्कळसे चित्रण जपानचीनमध्ये झाले.

किल बिलला टीकाकारांनी व प्रेक्षकांनी पसंत केले व हा चित्रपट यशस्वी ठरला. ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी उमा थर्मनला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.

बाह्य दुवे संपादन