किल बिल भाग १ हा २००३ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. क्वेंटिन टारान्टिनोचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये उमा थर्मन नायिकेच्या भूमिकेमध्ये आहे. ह्या चित्रपटाचे कथानक लांब बनल्यामुळे तो २ भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. किल बिलचा दुसरा भाग किल बिल भाग २ २००४ साली प्रदर्शित केला गेला.

किल बिल भाग १
दिग्दर्शन क्वेंटिन टारान्टिनो
निर्मिती लॉरेन्स बेंडर
कथा क्वेंटिन टारान्टिनो
संगीत उमा थर्मन
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १० ऑक्टोबर २००३
अवधी १११ मिनिटे


किल बिलचे कथानक सूड ह्या विषयावर आधारित असून वधूच्या वेषामध्ये उमा थर्मन लग्नाच्या तयारीमध्ये असताना तिच्या भूतपूर्व गॅंगमधील माजी सहकारी व त्यांचा म्होरक्या बिल तिला गोळ्या घालतात. ह्या हल्ल्यामधून ती बचावते व सूडाने पेटून बिल व इतर सर्व सहकाऱ्यांसोबत बदला घेते. ह्या चित्रपटाचे पुष्कळसे चित्रण जपानमध्ये झाले.

किल बिलला टीकाकारांनी व प्रेक्षकांनी पसंद केले व हा चित्रपट यशस्वी ठरला.

बाह्य दुवेसंपादन करा