कासे (संगमेश्वर)
कासे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
?कासे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | संगमेश्वर |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादन२०११ च्या जनगणनेनुसार कासे गावांची लोकसंख्या २०११ आहे. त्यापैकी ५४४ पुरुष आणि ७६१ महिला आहेत.[१]
कासे गाव पंधरा वाड्यांचे बनलेले आहे. पिंपळवाडी, घाणेकर वाडी, जड्यार/ गोताड वाडी, आडावराची वाडी, भंडारी वाडी, बुद्धवाडी, बहादूरवाडी,
(गुरव) कदमवाडी, शिगवण वाडी, राव वाडी, कोंडी वाडी, ब्राह्मण वाडी, गणेश वाडी, वरची जड्यार वाडी, वरची कातकर वाडी या पंधरा वाड्या आहेत.
गावात मुख्यत: जोशी, पाटणकर, मालशे, परांजपे, सुर्वे, खोत, गवंडे कुटुंबियांची घरे आहेत.
होळी (शिमगा) हा गावातील सर्वांत मोठा सार्वजनिक उत्सव आहे.
प्रेक्षणीय स्थळे
संपादन
कासे गावात श्री देव गजानन मंदिर हे सुमारे ३०० ते ४५० वर्षे जुने भाटे कुटुंबियांनी बांधलेले मंदिर आहे.[२] या मंदिरात गणेश चतुर्थी आणि माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी बाहेरगावी असलेले ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. १९७०-७२ च्या सुमारास मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि मंदिराच्या आवारात असलेली हनुमान आणि शंकर यांची छोटी मंदिरे गजानन मंदिराच्या आत हलवण्यात आली. या मंदिराची व्यवस्था 'कासे ग्राम गजानन सेवा मंडळ' पाहते. माघी गणेशोत्सवाच्या वेळी इ.स. १९२२ पासून नाटक, लळीत इ. ग्रामस्थ मंडळीनीच सादर करण्याची परंपरा आहे.[३] मूळचे कासे गावातील असलेले सुप्रसिद्ध वैद्य ना.ह. जोशी यांच्या स्मृत्यर्थ मंदिराच्या समोर ‘कै. ना. ह. जोशी समाजमंदिर’ बांधण्यात आले आहे.
नागरी सुविधा
संपादनगावामध्ये रास्त भाव धान्य दुकान आहे.
१९६८ साली गावात वीज पुरवठा सुरू झाला.१९८९ सालापासून येथे पाणी योजना कार्यान्वित झाली.[४]
शाळा
संपादनगावामध्ये पूर्व प्राथमिक शाळा कासे क्रमांक १, आणि प्राथमिक शाळा कासे क्र. २ या शाळा आहेत.[४]
ग्रामपंचायत
संपादनकासे गाव कासे-असावे ग्रुप ग्राम पंचायतीत येते.[४]
जवळपासची गावे
संपादनसंदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/
- ^ "Kase Population - Ratnagiri, Maharashtra".
- ^ जोशी आप्पा, पाटणकर विश्वास (२०१८). आमचा गाव, आमचे मंदिर. विद्याधर राजाराम जोशी. pp. ३.
- ^ आप्पा जोशी, विश्वास पाटणकर (२०१८). आमचा गाव आमचे मंदिर. कासे: विद्याधर राजाराम जोशी. pp. ३३.
- ^ a b c जोशी आप्पा, पाटणकर विश्वास (२०१८). आमचा गाव, आमचे मंदिर. विद्याधर राजाराम जोशी. pp. ७५.