लळीत
कीर्तनाच्या शेवटी लळीत करण्याचा प्रघात संत एकनाथांनी सुरू केला. ह्या लळीतांतून पुढे नाथांच्या भजनी भारुडाचा जन्म झाला.
लळिताचा मूळ उद्देश वेद आणि त्यांचे तत्त्वज्ञान हलक्या फुलक्या करमणूक साधनांद्वारे लोकांपर्यत पोहचविणे हा आहे.धार्मिक उत्सवाच्या शेवटी लळित सादर केले जाते.त्यात छडिदार,भालदार,चोपदार,वासुदेव,दंडीगान,गोंधळी,वाघ्या मुरळी,बहिरा,मुका,आंधळा इ. पात्रांद्वारा सादरीकरण केले जाते.याद्वारे गावभाट,गाववाघ्या,गावदंडीगाण,वासुदेव,जोशी अशा अनेक ईश्वरी उपासकांचे आणि जातमांगल्यांचे दर्शन लळितात होते. समाजातील विविध वैगुण्यावर बोट ठेवून सामाजिक कुरीतीचे,जातीय-धार्मिक वर्चस्वाचे, अहंकाराचे दर्शन लळितातून घडविले जाते.[ संदर्भ हवा ]
लळीत आजही फलटण तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दर वर्षी सादर केले जाते