काराचाय-चेर्केशिया
(काराचाय-चेर्केस प्रजासत्ताक या पानावरून पुनर्निर्देशित)
काराचाय-चेर्केशिया प्रजासत्ताक (रशियन: Карачаево-Черкесская Республика; काबार्दियन: Къэрэшей-Шэрджэс Республикэ; काराचाय-बाल्कर: Къарачай-Черкес Республика) हे रशिया देशाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. हे प्रजासत्ताक रशियाच्या नैऋत्य भागात कॉकेशस प्रदेशात जॉर्जिया देशाच्या सीमेजवळील अबखाझिया ह्या वादग्रस्त प्रदेशाजवळ वसले आहे. कॉकासस पर्वतरांगेमध्ये असलेल्या ह्या प्रदेशाचा मोठा भाग डोंगराळ आहे.
काराचाय-चेर्केशिया Карача́ево-Черке́сская Респу́блика | |||
रशियाचे प्रजासत्ताक | |||
| |||
![]() काराचाय-चेर्केशियाचे रशिया देशामधील स्थान | |||
देश | ![]() | ||
केंद्रीय जिल्हा | उत्तर कॉकासियन | ||
स्थापना | ९ जानेवारी १९५७ | ||
राजधानी | चेर्केस्क | ||
क्षेत्रफळ | १४,१०० चौ. किमी (५,४०० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ४,७७,८५९ | ||
घनता | ३३.९ /चौ. किमी (८८ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | RU-KC |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c6/Karachay_Cherkess03.png/250px-Karachay_Cherkess03.png)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/90/Elbrus_North_195.jpg/250px-Elbrus_North_195.jpg)
एल्ब्रुस पर्वत हा युरोपामधील सर्वात उंच पर्वत (शिखर उंची: १८,५१० फूट) काराचाय-चेर्केशिया व काबार्दिनो-बाल्कारियाच्या सीमेवर स्थित आहे.
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2013-01-19 at the Wayback Machine. (रशियन)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत