कलिना विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
कलिना विधानसभा मतदारसंघ - १७५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, कलिना मतदारसंघात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील जनगणना वॉर्ड क्र. १०४८ मधील इन्युमरेशन ब्लॉक ५९ ते ७६, १२९ ते ३२४, ३४० ते ४३०, ४३८ ते ४८३, जनगणना वॉर्ड क्र. १९७५ मधील इन्युमरेशन ब्लॉक २८, ४७ ते १२६, १४८ ते १५५ , २०२ ते २४० आणि जनगणना वॉर्ड क्र. १९७८ मधील इन्युमरेशन ब्लॉक १ ते ५४, ६२, ६३, ७० ते ७२, ७९ ते १२५, १३९ ते १६३, ५७४ ते ५७९ आणि ८३७ यांचा समावेश होतो. कलिना हा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे संजय गोविंद पोतनीस हे कलिना विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | संजय गोविंद पोतनीस | शिवसेना | |
२०१४ | संजय गोविंद पोतनीस | शिवसेना | |
२००९ | कृपाशंकर सिंग | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
कलिना | ||
उमेदवार | पक्ष | मत |
कृपाशंकर सिंग | काँग्रेस | ५१,२०५ |
चंद्रकांत गेनू मोरे | मनसे | ३८,२८४ |
ऍड. दीनानाथ तिवारी | भाजप | १३,९९४ |
अशरफ आझमी असलम आझमी | सपा | १०,९७७ |
श्रवण यमाजी मोरे | बसपा | १,२२८ |
सैयद ताकी हैदर | अपक्ष | ६२५ |
मोहम्मद अय्युब राजापूरकर | अपक्ष | ३४३ |
क्रिश्नकांत भगवानलाल गोस्वामी | अहिरा | २८९ |
ऐजाझ नझीर शेख | शांती पक्ष | २८२ |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".