करसनभाई पटेल

निरमा कंपनीचे संस्थापक, उद्योजक

करसनभाई खोडीदास पटेल (जन्म:१९४५, रुपपूर, पाटण, गुजरात) हे एक भारतीय अब्जाधीश व्यापारी, उद्योगपती आणि निरमा समूहाचे संस्थापक आहेत. पटेल हे सिमेंट, डिटर्जंट, साबण आणि सौंदर्यप्रसाधने यामधील प्रमुख व्यावसायिक आहेत. २०२१ पर्यंत फोर्ब्सने त्यांची एकूण संपत्ती US$4.9 अब्ज पेक्षा जास्त असल्याची माहिती दिली आहे.[१] पटेल यांनी आघाडीचे फार्मसी कॉलेज (निरमा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी) आणि एक आघाडीचे अभियांत्रिकी महाविद्यालय/विद्यापीठ देखील स्थापन केले.

करसनभाई पटेल
जन्म करसनभाई खोडीदास पटेल
इ.स. १९४५ (वय: अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२"अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "२")
पाटण, गुजरात
नागरिकत्व भारतीय
शिक्षण विज्ञानातील पदवीधर
पेशा व्यावसायिक
मालक निरमा
अपत्ये
पुरस्कार पद्मश्री

उत्तर गुजरातमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या करसनभाई यांनी वयाच्या २१ व्या वर्षी रसायनशास्त्रात बीएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि लॅब टेक्निशियन म्हणून प्रथम लालभाई समूहाच्या अहमदाबादच्या न्यू कॉटन मिल्समध्ये आणि नंतर राज्य सरकारच्या भूविज्ञान आणि खाण विभागात काम केले. १९६९ मध्ये, करसनभाईंनी त्यांच्या घरामागील अंगणात उत्पादित आणि पॅकेज केलेले डिटर्जंट पावडर विकण्यास सुरुवात केली. हा कार्यालयीन कामकाजा व्यतिरिक्त एकट्याने केलेला व्यवसाय होता. करसनभाई सायकलने आजूबाजूच्या परिसरात घरोघरी जाऊन स्वतः हाताने बनवलेल्या डिटर्जंटची पाकिटे विकत असत. याची किंमत ३₹ प्रति किलो, (अग्रगण्य डिटर्जंटच्या किंमतीच्या एक तृतीयांश) होती. करसनभाईंनी निरमा हे नाव त्यांच्या निरुपमा या दिवंगत मुलीच्या नावा वरून ठेवलेले होते.[२] या व्यवसायात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्या नंतर तीन वर्षांनी, करसनभाईंनी आपली चालू नोकरी सोडली. करसनभाईंनी अहमदाबादच्या उपनगरात एका छोट्या वर्कशॉपमध्ये आपले दुकान थाटले. निरमा ब्रँडने गुजरात आणि महाराष्ट्रातील बाजारपेठ अत्यंत वेगाने काबीज केली.

डिटर्जंटची उच्च गुणवत्ता आणि कमी किंमत यामुळे या पावडरला मोठी मागणी निर्माण झाली. सर्वसामान्य घरगृहिनी जाहिरातींच्या जिंगल्समुळे, निरमाने डिटर्जंट मार्केटमध्ये क्रांती घडवून आणली, डिटर्जंट पावडरसाठी बाजारपेठेत पूर्णपणे नवीन विभाग तयार केला. त्यावेळी, डिटर्जंट आणि साबण निर्मितीवर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व होते, ज्यात हिंदुस्तान लीव्हरचे सर्फ सारखी उत्पादने होती, ज्याची किंमत सुमारे रु. १३ प्रति किलो इतकी होती. एका दशकात निरमा हे भारतात सर्वाधिक विकले जाणारे डिटर्जंट होते. हे उत्पादन श्रम-केंद्रित असल्याने, निरमा देखील एक अग्रगण्य नियोक्ता बनली, जिने २००४ साली १४,००० लोकांना रोजगार दिला. फॉस्फेट विरहित बनवलेले निरमा काहीसे पर्यावरणपूरक देखील होते.

अत्यल्प किमतीतील डिटर्जंटमध्ये आपला जम प्रस्थापित केल्यानंतर, निरमाने प्रीमियम विभागात प्रवेश केला, टॉयलेट सोप 'निरमा बाथ' आणि 'निरमा ब्युटी सोप' आणि प्रीमियम डिटर्जंट 'सुपर निरमा डिटर्जंट' लॉन्च केले. शॅम्पू आणि टूथपेस्टचे उपक्रम तितकेसे यशस्वी झाले नाहीत, परंतु खाद्य मीठ 'शुद्ध' चांगली बाजारपेठ काबीज करून आहे. लाइफबॉय आणि लक्स पाठोपाठचा निरमा ब्युटी सोप हा एक आघाडीचा साबण आहे. एकूणच निरमा कंपनीचा साबण केकमध्ये २०% आणि डिटर्जंटमध्ये सुमारे ३५% हिस्सा आहे. निरमाचे शेजारील देशांमध्येही यशस्वी व्यवसाय सुरू आहेत.

१९९५ मध्ये, करसनभाईंनी अहमदाबादमध्ये निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरू केली, जी गुजरातमधील एक प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालय बनली. निरमा एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनच्या देखरेखीखाली २००३ मध्ये निरमा युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत संपूर्ण रचना एकत्रित करून व्यवस्थापन संस्थेने पाठपुरावा केला. निर्मलब्स एज्युकेशन प्रोजेक्ट, ज्याचा उद्देश उद्योजकांना प्रशिक्षण देणे आणि इनक्यूबेट करणे हा आहे, २००४ मध्ये सुरू करण्यात आला.

करसनभाईची दोन मुले, एक मुलगी आणि जावई आता निरमा संस्थेत आघाडीच्या पदांवर आहेत:[३] राकेश के पटेल (एमबीए) प्रोक्योरमेंट आणि लॉजिस्टिक्स पाहतात, हिरेन के पटेल, केमिकल इंजिनीअर आणि एमबीए, मार्केटिंग आणि फायनान्स प्रमुख, तर कल्पेश पटेल मानव संसाधन आणि आरोग्य सेवा उद्योग (निर्लाइफ हेल्थकेअर) मध्ये आहेत.

पुरस्कार आणि ओळख संपादन

२०१९ मध्ये, फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत करसनभाईंना ३० व्या क्रमांकावर ठेवले होते.[४]

२००१ मध्ये, फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीने करसनभाईंना त्यांच्या अपवादात्मक उद्योजकीय आणि परोपकारी कामगिरीची दखल घेऊन मानद डॉक्टरेट बहाल केली.

१९९० मध्ये फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ऑफ इंडिया (FASII), नवी दिल्ली यांनी त्यांना 'उद्योगरत्न' पुरस्काराने सन्मानित केले. गुजरात चेंबर ऑफ कॉमर्सने 'ऐंशीच्या दशकातील उत्कृष्ट उद्योगपती' म्हणून त्यांचा सत्कार केला. तेल, साबण आणि डिटर्जंट विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दोनदा काम केले आहे.

पटेल यांना २०१० साठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[५] भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार औपचारिकपणे प्रदान करण्यात आला.

७ जून २०१३ रोजी त्यांनी ४०० दशलक्ष रुपये किमतीचे सहा आसनी हेलिकॉप्टर खरेदी केले. अदानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि झायडस समूहाचे प्रवर्तक पंकज पटेल यांच्यानंतर, हेलिकॉप्टर खरेदी करणारे करसनभाई हे अहमदाबाद येथील तिसरे उद्योगपती आहेत.

२०१७ मध्ये, करसनभाईंना फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या ($3.6 अब्ज) यादीत ३८ व्या क्रमांकावर स्थान दिले.[६]

२०१९मध्ये, फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत करसनभाईंना ३०व्या क्रमांकावर ठेवले ($3.9 अब्ज).[७]

संदर्भ संपादन

  1. ^ "Karsanbhai Patel". Forbes (इंग्रजी भाषेत). 11 May 2021 रोजी पाहिले.
  2. ^ Swati Daftuar (2 November 2014). "...and then NIRMA stormed in". The Hindu. His Nirma, derived with love from the name of his daughter Nirupama, was going to be “Sabki Pasand Nirma”.
  3. ^ "Nirma group home page: Genesis". 2004. 24 November 2006 रोजी पाहिले.
  4. ^ "Indian Billionaires". Forbes Magazine.
  5. ^ "This Year's Padma Awards announced" (Press release). Ministry of Home Affairs. 25 January 2010. 25 January 2010 रोजी पाहिले.
  6. ^ "India Rich List 2017 – Forbes India Magazine".
  7. ^ "Forbes India Rich List 2019 – Forbes India Magazine".