कौच्च, बांडी, कार्कुंग, करकोचा, पोषा, करकरा, कुंज (इंग्लिश:Demoiseiie Crane; हिंदी:करकरा, कुंज) हा एक पाणपक्षी आहे.

कौच्च

या पक्ष्याचा आकार बदकापेक्षा मोठा असतो व अंदाजे तीन फुट उंच . सुबक ,सुंदर , लहानखोरा दिसणारा करकोचा . राखी रंग , डोके व मान काळी आणि डोक्यावर पिसे असतात . कानाच्या छीद्रानावरची पिसे पांढरी व नर आणि मादी दिसायला सारखेच असतात . हे पक्षी थव्याने आढळतात .

वितरण संपादन

पाकिस्तान मध्ये हिवाळी पाहुणे म्हणून असतात . उत्तर भारत ते बांगला देश , आसाम , महाराष्ट्र , दक्षिणेकडे कर्नाटक येथे ही आढळतात . युरोप मध्य आशिया , मंगोलिया येथे मे ते जुलै या काळात स्थायिक असतात.

निवासस्थाने संपादन

हे पक्षी निवासाला नदीकाठ , झिलानी , आणि भातशेतीचा ,तसेच करडी , गहू ,आणि हरभर्याच्या शितीचा प्रदेश अश्या टिकाणी असतात .

संदर्भ संपादन

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली