ओस्बॉर्न स्मिथ
ओस्बॉर्न स्मिथ (डिसेंबर २६, १८७६ - ऑगस्ट ३०, १९५२) हे भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते.
सर ओस्बॉर्न स्मिथ यांनी भारतात येण्यापूर्वी बँक ऑफ न्यु साउथ वेल्स ऑस्ट्रेलिया मध्ये २० वर्षे आणि कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया या बँकेत १० वर्षे काम केले होते. १९२६ साली स्मिथ भारतात आले आणि ते भारतीय स्टेट बँकेचे (तत्कालीन इंपेरियल बँक ऑफ इंडिया) मॅनेजींग गव्हर्नर म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या योगदानाबद्दल १९२९ साली त्यांना सर किताब (knighthood) बहाल करण्यात आला.
रिझर्व बँकेची स्थापना १९३५ साली करण्यात आली आणि एप्रिल १, १९३५ ते जून ३०, १९३७ या काळात ओस्बॉर्न स्मिथ यांनी रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून कार्य पाहिले. सरकारशी मतभेद झाल्याने स्मिथ यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या कार्यकाळात सर स्मिथ यांनी एकाही नोटवर सही केली नाही.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरील गव्हर्नरांच्या माहितीचे पान Archived 2015-03-17 at the Wayback Machine.
मागील: नवे पद |
रिझर्व बँकेचे गव्हर्नर एप्रिल १, १९३५ – जून ३०, १९३७ |
पुढील: सर जेम्स ब्रेड टेलर |