ओणनवसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे.

  ?ओणनवसे
ओणी
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर दाभोळ,दापोली
जिल्हा रत्नागिरी जिल्हा
लोकसंख्या १,५०० (२०११)
भाषा मराठी
सरपंच राजेंद्र आदावडे
बोलीभाषा मराठी (ग्रामीण कोकणी)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 415706 एसटीडी_कोड =
• +०२३५८
• MH08 एमएच/

भौगोलिक स्थान

संपादन

भारताच्या पश्चिमेस आणि दक्षिण कोकणात

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

संपादन

स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने आणि तरुण वर्गाची शेतीकडे दुर्लक्ष झाल्याने बहुतांशी लोकसंख्या मुंबई शहराकडे स्थलांतरित भागातील खारवी(मच्छीमार) समाज बऱ्यापैकी गावातच स्थिर झालेला आहे गावात कोणत्याही प्रकारचे उद्योगधंदे उपलब्ध नाहीत त्यामुळे रोजच्या मजुरीवर सर्व गावातील लोक अवलंबून गावात बालवाड्या तसेच दोन प्राथमिक आणि एक माध्यमिक शाळा गणेशोत्सव होळी दिवाळी यांसारखे सण साजरे केले जातात

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

इंगळेवाडी येथील कड्यावरील झोत धबधबा गावची ग्रामदेवता श्री सातमाई देवी मंदिर येथून जवळच derde गावात उंच डोंगरावर बालापीर नावाची वास्तू त्याच डोंगरात कोरलेली घोड बाव त्याचबरोबर पन्हाळेकाझी येथी बौद्ध कालीन लेणी दाभोळच्या परिसरातील सुरुच्या गर्द झाडीलगत असणारा समुद्र किनारा त्याचबरोबर माँ साहेब दर्गा अंडा मस्जिद ग्रामदैवत चंडिका देवी मंदिर दाभोळ हे प्राचीन भारतातील प्रमुख बंदर म्हणून प्रसिद्ध होते

इथून गरम पाण्याचे झरे(उन्हवरे) त्याचबरोबर गोपालगड किल्ला गुहागर दापोलीतील खूप पर्यटन स्थळे साधारण 5ते 30 किलोमीटर च्या अंतरावर पाहता येतील

=जवळपासची गावे

संपादन

Derde, उसगाव ,उंबरघर,भोपण, आगरवायंगणी

संदर्भ

संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/