ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन
ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन किंवा आजसू हा भारताच्या झारखंड राज्याचा एक राजकीय पक्ष आहे.[१] ह्याची स्थापना २२ जून १९८६ रोजी करण्यात आली, जी ऑल आसाम स्टुडंट्स युनियनच्या अनुकरणाने तयार करण्यात आली. पक्षाच्या संस्थापकांचा झारखंडच्या पूर्वीच्या राजकीय पक्षांबद्दल भ्रमनिरास झाला होता आणि त्यांना आणखी लढाऊ आंदोलने हवी होती.
political party in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राजकीय पक्ष | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
| |||
पक्षाने १९८९ मध्ये लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यासाठी सामान्य संप आणि मोहीम आयोजित केली. पण १९९० पर्यंत, पक्षाने अधिक व्यावहारिक मार्ग स्वीकारला आणि बिहार विधानसभा निवडणुकीसाठी झारखंड मुक्ती मोर्चा चिन्हावर उमेदवार उभे केले. आज पक्ष स्वतःच्या नावाने निवडणूक लढवतो.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत युती केली होती. २००५ च्या झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोबत तोडून लोक जनशक्ती पक्षासोबत युती केली होती.[२]
निवडणूक कामगिरी
संपादनलोकसभा निवडणूक
संपादनलोकसभा | निवडणूक | जागा लढले | जागा जिंकले | राज्य |
---|---|---|---|---|
१४ वी लोकसभा | २००४ | ५ | ० | झारखंड |
१५ वी लोकसभा | २००९ | ६ | ० | |
१६ वी लोकसभा | २०१४ | ९ | ० | |
१७ वी लोकसभा | २०१९ | १ | १ | |
१८ वी लोकसभा | २०२४ | १ | १ |
विधानसभा निवडणुका
संपादनविधानसभा | निवडणूक | जागा लढले | जागा जिंकले |
---|---|---|---|
दुसरी झारखंड विधानसभा | २००५ | ४० | २ |
तिसरी झारखंड विधानसभा | २००९ | ५४ | ५ |
चौथी झारखंड विधानसभा | २०१४ | ८ | ५ |
पाचवी झारखंड विधानसभा | २०१९ | ५३ | २ |
संदर्भ
संपादन- ^ "List of Political Parties and Election Symbols main Notification Dated 18.01.2013" (PDF). India: Election Commission of India. 2013. 9 May 2013 रोजी पाहिले.
- ^ "Jharkhand elections: Sudesh Mahto loses from Silli - IBNLive". ibnlive.in.com. 23 December 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 January 2022 रोजी पाहिले.