चौल हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे.

  ?चौल

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अलिबाग
जिल्हा रायगड जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान

संपादन

हवामान

संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन
  1. कोर्लई किल्ला
  2. ऐतिहासिक धार्मिक स्थळ चौल भगवती

अलिबाग तालुक्यातील चौल येथे भगवती गावात वसलेले हे मंदिर खूप मनमोहक आणि आल्हाददायी आहे .

        चौलच्या इतिहासानुसार चौल नगरी ही व्यापाऱ्यांची नगरी म्हणून ओळखली जाते. या चौल नगरीत ३६० मंदिरे आहेत. त्याच चौल मधील खूप जूने बांधकाम असलेले हे भगवती मंदिर आहे.

          भगवती देवीच्या नावावरून येथील गावाला भगवती असे नाव पडले आहे . मंदिराच्या गाभाऱ्यावर लाकडी खाबांवर संस्कृत भाषेत नमूद केल्या नुसार , या मंदिराचा जीर्णोद्धार  इ . स. १७१२ साली झाला आहे.

            निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर खूप जूने व जिर्णोद्धार झाल्या पासून ते आता पर्यंत आहे तसेच आहे . तसेच चौल नगरीतील सर्वात मोठे हे भगवती मंदिर आहे . नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी अशी श्री एकविरा भगवती देवीचे हे मंदिर आहे .

             भगवती देवीचे मंदिर हे खूप छान व प्रसन्न वाटनारे असे कौलारू आणि पाषाणी आहे . मंदिराच्या भोवती सुंदर परिसर व मंदिराच्या सभोवताली तटबंदी आहे . मंदिराच्या पारिसरात गावकऱ्यांना प्रवेश करण्यासाठी पूर्व , पश्चिम , दक्षिण , व उत्तर असे प्रवेशद्वार आहेत .

            भगवती मंदिराच्या डाव्याबाजूस श्री शंकराचे छोटे मंदिर आहे . शंकराच्या मंदिराच्या मागील बाजूस पोखरण आहे . मंदिरात प्रवेश करताना लाकडी दरवाजा आहे त्याला "लाटीचा " दरवाजा असे बोलतात मंदिरामध्ये सर्व बांधकाम हे लाकडी आहे . लाकडी खांबांवर  आकर्षक नक्षीकाम केलेले  आहे .  मंदिरातून बाहेर जाण्यासाठी एक छोटा लाकडी ( लाटीचा ) दरवाजा ही आहे .

             भगवती देवीची मूर्ति ही स्वयंभू आहे . देवीच्या उजव्या बाजूला रक्षकाची छान मूर्ती आहे . गाभाऱ्याबाहेर गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला श्री गणपती व श्री विष्णू याची संगमरवराची अतिशय सुंदर मूर्ती आहेत . मंदिराच्या सभामंडपात मध्यभागी यज्ञ कुंड आहे .

            या यज्ञकुंडात दरवर्षी नवरात्रीच्या नवव्या दिवशी रात्री होम केला जातो . या दिवशी मंदिरात गावकरी बांधवासह कोळी भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळते .

             श्री एकविरा भगवती मंदिर हे सकाळी ८.०० ते संध्याकाळी ८.०० पर्यंत भक्तांना दर्शनासाठी खुले असते . रोज सकाळी देवीची पूजा होऊन सकाळी व संध्याकाळी घंटा वाजवून आरती केली जाते .

             दर वर्षी घटस्थापनेच्या दिवशी नऊरात्रीत देवीची नऊ दिवस मोठी जत्रा भरते . खूप दूरवरून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात . नऊरात्रीच्या नवव्या दिवशी मंदिरात देवीसाठी होम हवन मंत्र पठण केले जाते . होमचा विधी हा रात्री १२.०० वाजता मंत्र पठण झाल्यावर वाजत गाजत नाचत देवीच्या गाभाऱ्या भोवती   पाच फेऱ्या मारल्या जातात . असे हे नऊरात्रीचे नऊ दिवस खूप आनंदाने साजरे केले जातात ..

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

संदर्भ

संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/