एस्थर डुफ्लो (२५ ऑक्टोबर, १९७२:पॅरिस, फ्रांस - ) ह्या एक फ्रेंच-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत.[] त्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मधील गरीबी निर्मूलन आणि विकास अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. २००३ मध्ये स्थापन झालेल्या अब्दुल लतीफ जमील लॅबच्या त्या सह-संस्थापक आणि सह-दिग्दर्शिका आहेत. [] अभिजित बॅनर्जी आणि मायकेल क्रेमर यांच्या "जागतिक दारिद्र्य निर्मूलनाच्या त्यांच्या प्रयोगात्मक दृष्टिकोनाबद्दल" त्यांना अर्थशास्त्रातील २०१९ चे नोबेल स्मारक पुरस्कार सामायिक केले.[]

एस्थर डुफ्लो

२००९ मध्ये ड्युफ्लो
जन्म २५ ऑक्टोबर, १९७२ (1972-10-25) (वय: ५२)
पॅरिस, फ्रान्स
नागरिकत्व फ्रान्स आणि अमेरिका[]
कार्यक्षेत्र सामाजिक-आर्थिकशास्त्र
विकास अर्थशास्त्र
कार्यसंस्था मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
प्रशिक्षण इकोले नॉर्मले सुपरप्राइअर, पॅरिस (कलाशाखेची पदवी)
प्रगत सामाजिक विज्ञान शाळा (डीईए)
मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पीएचडी)
डॉक्टरेटचे मार्गदर्शक अभिजित बॅनर्जी[]
जोशुआ ॲंग्रिस्ट[]
डॉक्टरेटकरता विद्यार्थी डीन कारलन[]
रेमा हाना[]
नॅन्सी कियान[]
पुरस्कार अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्कार (२०१९)
प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस अवॉर्ड्स (सामाजिकशास्त्रे, २०१५)
जॉन फॉन न्यूमॅन अवॉर्ड (२०१३)
डॅन डेव्हिड पुरस्कार (२०१३)
जॉन बेट्स क्लार्क पुरस्कार (२०१०)
कॅल्व्हो-आर्मेंगोल आंतरराष्ट्रीय पुरस्कार (२०१०)
पती अभिजित बॅनर्जी (२०१५ पासून)

डुफ्लो यांचा जन्म पॅरिस येथे झाला. त्यांचे इतिहास व अर्थशास्त्र विषयाचे पदवीपर्यंतचे शिक्षण पॅरिसमधील इकोले नॉर्मले सुपिरियर या संस्थेतून झाले (१९९४). पदवीचे शिक्षण घेत असतानाच रशियामधील मॉस्को शहरात मोठ्या बांधकामांचा विनियोग प्रकल्पांचा आकार ठरविण्यासाठी कसा होतो, याचा अभ्यास त्यांनी केला.

तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या आर्थिक सल्लागार, अर्थमंत्र्याचे सल्लागार म्हणून डुफ्लो यांनी काम केले आहे. तसेच अमेरिकन अर्थतज्ज्ञ प्रा. जेफरे साच्स यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले. या अनुभवातून त्यांना अर्थशास्त्राच्या माध्यमातून जागतिक पातळीवर उपयुक्त व भरीव कामगिरी करावी ही प्रेरणा मिळाली.

पुढे त्यांनी पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (त्या वेळच्या डेल्टा) या संस्थेतून पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले (१९९५). त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ‘एमआयटी’मधून अर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट ही पदवी मिळवली (१९९९). अभिजित बॅनर्जी व अर्थतज्ज्ञ जोशूया ॲग्रॅस्टि हे त्यांचे मार्गदर्शक होते. ‘एमआयटी’मध्ये त्या अर्थशास्त्राच्या कायमस्वरुपी नियक्ती लाभलेल्या (टेन्यूअर) सहयोगी प्राध्यापक झाल्या. २०१५ मध्ये अभिजित बॅनर्जी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले आहेत.

जगातील गरीब लोक कसे पिचले जातात, देशांचे आर्थिक धोरण त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी कसे साहाय्यक ठरू शकते या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डुफ्लो यांनी सुमारे वीस वर्षे खर्च केली. गरीबांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक व आर्थिक धोरणे कशी कारणीभूत होतात, हा त्यांच्या अभ्यासाचा प्रमुख विषय आहे.

शिवाय आरोग्य, शिक्षण, विकास या गोष्टी दारिद्र्य निर्मुलनाच्या बाबतीत मोलाची भूमिका बजावत असतात, हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केले. केन्यातील एच. आय. व्ही. प्रतिबंध, शिक्षकांना दिलेले प्रोत्साहन विद्यार्थ्यांना कसे साहाय्यभूत ठरते हे त्यांनी आभ्यासले. भारतातील आरोग्य, विमा व सूक्ष्मवित्त लस्सीकरणाचा वाढता दर व त्याचे परिणाम यांबाबत विस्तृत लेखन केले. त्यांनी अभ्यासलेल्या देशांमधील लोकांमध्ये एक समान धागा आढळतो. तो म्हणजे सद्यपरिस्थितीतील त्यांचा आवेगपूर्णपणामुळे ते भविष्यात अधिक विवेकी वर्तन करतील.

डुफ्लो यांनी आपले सहकारी अभिजित व क्रेमर यांच्या सहकाकार्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी यादृच्छित (सर्वसाधारण) नियंत्रित चाचणी (रॅंडमाईज्ड कंटोल ट्रायल – आरसीटी) ही पद्धत विकसित केली. सदरची पद्धत मोठ्या प्रमाणावर औषध निर्मिती क्षेत्रात नवीन औषधांची चाचणी करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे औषधांच्या स्विकृतीसंबंधी जसे निर्णय घेणे शक्य होते, तसे एखाद्या धोरणाची पडताळणी करून गरिबी हटविण्यासाठी ते कितपत यशस्वी ठरू शकेल हे ठरविता येते. भारतातील विकासाच्या अनेक धोरणांना त्या वेडसरपणा (खूळ) असे संबोधतात.

दिशाहीन धोरणामुळे अर्थव्यवस्थेला फार लाभ झाला नाही, हे आपल्या मुल्यमापनाच्या आधारे ते स्पष्ट करतात. ग्रामीण भागातील प्रयोगासाठी जास्तीत जास्त लोकांचा समावेश करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांनी ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५’ (महात्मा गांधी नॅशनल सरल एप्लायमेंट गॅरन्टी ॲक्ट २००५)ची उपयुक्तता तपासण्यासाठी ३,००० ग्रामपंचायती व सुमारे ३ कोटी लोकांची पाहणी केली.

सध्या हरियाणातील शेकडो मुलांच्या लस्सीकरणाचा कार्यक्रम त्या राबवीत असून त्यासाठी भ्रमणध्वनी (मोबाईल) लस्सीकरणाचा त्यासाठी पुरस्कार करतात. त्यांच्या अभूतपूर्व कार्यामुळे इकॉनॉमिस्ट या प्रसिद्ध नियतकालिकांकडून त्यांना जगातील पहिल्या आठ तरुण अर्थशास्त्रज्ञांमध्ये स्थान देण्यात आले; तर २०१० मध्ये टाइम्स या प्रसिद्ध नियतकालिकांकडून जगातील पहिल्या शंभर प्रतिभाशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Esther Duflo CV". 2019-04-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-10-22 रोजी पाहिले.
  2. ^ a b Duflo, Esther (1999), Essays in empirical development economics. Ph.D. dissertation, Massachusetts Institute of Technology.
  3. ^ Karlan, Dean S. (2002), Social capital and microfinance. Ph.D. dissertation, Massachusetts Institute of Technology.
  4. ^ Hanna, Rema (2005), Essays in development and environmental economics. Ph.D. dissertation, Massachusetts Institute of Technology.
  5. ^ Qian, Nancy (2005), Three essays on development economics in China. Ph.D. dissertation, Massachusetts Institute of Technology.
  6. ^ "Esther Duflo Short Bio and CV". 2019-04-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-10-22 रोजी पाहिले.
  7. ^ Biswas, Soutik (15 October 2019). "The Nobel couple fighting poverty cliches". BBC (इंग्रजी भाषेत). 16 October 2019 रोजी पाहिले.
  8. ^ "The Prize in Economic Sciences 2019" (PDF). Royal Swedish Academy of Sciences: Nobel prize. 14 October 2019. 14 October 2019 रोजी पाहिले.