एमएम-१०४ पेट्रियट
एमएम-१०४ पेट्रियट (इंग्लिश: MIM-104 Patriot ;) हे अमेरिकेचे पृष्टभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेतील रेथिऑन कंपनीद्वारे उत्पादन केले जाणारे हे क्षेपणास्त्र अमेरिकेन भूदलात व अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांच्या सैन्यदलांत वापरले जाते. सध्या अमेरिकन भूदलात ते प्रमुख क्षेपणास्त्ररोधी क्षेपणास्त्र, अर्थात बॅलिस्टिकरोधी क्षेपणास्त्र, म्हणून वापरले जाते.
हे क्षेपणास्त्र तायवान, इजिप्त, जर्मनी, ग्रीस, इस्राएल, जपान, कुवेत,नेदरलंड्स, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, स्पेन, पोलंड या देशांस विकले गेले आहे. इ.स. २००६ साली उत्तर कोरियाने जपानाच्या समुद्रात क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्यानंतर त्यास अप्रत्यक्ष प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने जर्मनीकडून पेट्रियट क्षेपणास्त्रे खरीदली.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अमेरिकन भूदलाचे अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- रेथिऑन कंपनीचे अधिकृत पेट्रियट संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)