उदय चोप्रा
(उदय चोपरा या पानावरून पुनर्निर्देशित)
उदय चोप्रा ( ५ जानेवारी १९७३) हा एक भारतीय अभिनेता व दिग्दर्शक आहे. यश चोप्राचा मुलगा व आदित्य चोप्राचा भाऊ असलेल्या उदयने यश राज फिल्म्स बॅनरखालील अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे. त्याने २००० सालच्या मोहब्बतें ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये अभिनेत्याच्या रूपाने पदार्पण केले. तेव्हापासून त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
उदय चोप्रा | |
---|---|
जन्म |
५ जानेवारी, १९७३ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक |
कारकीर्दीचा काळ | १९९२ - चालू |
वडील | यश चोप्रा |
नातेवाईक | आदित्य चोप्रा |
चित्रपटयादी
संपादनवर्ष | चित्रपट |
---|---|
२००० | मोहब्बतें |
२००२ | मेरे यार की शादी है |
२००३ | मुझसे दोस्ती करोगे! |
२००३ | सुपारी |
२००४ | चरस: अ जॉइंट ऑपरेशन |
२००४ | धूम |
२००५ | नील 'एन' निक्की |
२००६ | धूम २ |
२०१० | प्यार इम्पॉसिबल |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील उदय चोप्रा चे पान (इंग्लिश मजकूर)