इस्फहान प्रांत

इराणचा प्रांत

इस्फहान (फारसी: استان اصفهان, ओस्तान-ए-इस्फहान) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या मध्य भागात स्थित आहे. याच्या उत्तरेस मर्काझी, कोमसेमनान हे प्रांत वसले असून दक्षिणेस फार्स आणि कोगिलुये व बोयेर-अहमद हे प्रांत वसले आहेत. इस्फहानाच्या सीमा पूर्वेस याझ्द, पश्चिमेस लोरेस्तान, नैऋत्येस चहार्महाल व बख्तियारी प्रांतांशी भिडल्या आहेत. इराणमधील तिसरे मोठे शहर इस्फहान हे या प्रांताचे राजधानीचे शहर आहे.

इस्फहान
استان اصفهان
इराणचा प्रांत

इस्फहानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
इस्फहानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी इस्फहान
क्षेत्रफळ १,०७,०२७ चौ. किमी (४१,३२३ चौ. मैल)
लोकसंख्या ४८,७९,३१२
घनता ४३ /चौ. किमी (११० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-10
संकेतस्थळ http://www.ostan-es.ir/

इस्फहान प्रांताचे क्षेत्रफळ १,०७,०२७ वर्ग कि.मी. असून लोकसंख्या ४८,७९,३१२ (इ.स. २०१२ च्या अंदाजानुसार) आहे.

बाह्य दुवे

संपादन
  • "अधिकृत संकेतस्थळ" (फारसी भाषेत).